Uncategorized
अनाधिकृत बांधकाम विरोधात आत्मदहानाचा इशारा
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरूर शहरातील सिटी सर्वे नं २१३/६ गुजर मळा (निर्माण प्लाझा ) येथील अनाधिकृत बांधकाम त्वरित पाडावे तसेच पुणे – नगर रोड वरील टपरीधारकांना ज्या नोटीसा दिल्या आहेत ते मागे घ्यावात व टपरी धारकांना एकाच ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणी साठी मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आत्म दहनाचा इशारा दिला आहे .
या संदर्भातील निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे कि शहरातील गुजर मळा (निर्माण प्लाझा ) येथील सिटी सर्वे नं २१३/६ येथील अनधिकृत वापर असुन या संदर्भात नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीस २०१७ ते २०२२ पर्यंत अनेक वेळा ५३ ,५४ ,५६ च्या अशा अनेक नोटीसा काढल्या मात्र नगरपरिषदेकडुन हे अतिक्रमण काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप घोगरे यांनी निवेदनात केला आहे .
शिरूर शहरातील गोरगरिबांना एक न्याय व प्रस्थापीना एक न्याय का? असा प्रश घोगरे यांनी विचारत आत्तापर्यंत नगरपरिषदेकडुन कुठलीही कारवाई व गुन्हा दाखल का केला नाही त्या मुळे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आत्मदहन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे .

