पंचवीस हजार ते चाळीस हजार लोकसंख्येच्या गटात शिरूर नगर परिषदेचा माझी वसुंधरा अभियान मध्ये राज्यात प्रथम क्रमांक, नागरिकांनी केले अभिनंदन

शिरूर प्रतिनिधी
25000 ते 40000 लोकसंख्येच्या गटात शिरूर नगर परिषदेचा माझी वसुंधरा अभियान मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून या पुरस्काराचे सर्वच कौतुक होत असून याबद्दल नागरिकांनी शिरूर नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे
माझी वसुंधरा अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक शिरूर नगर परिषदेत मिळाला असून भुमी थीमॅटिक मधील उच्चतम कामगिरी करत प्रथम क्रमांक त्यात मिळाला असून माजी वसुंधरा अंतर्गत शिरूर नगर परिषदेमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आली असून यामध्ये शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर नगरपरिषद या नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे उपनगराध्यक्ष मितेश गादिया स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव पाणीपुरवठा समितीचे सभापती डॉ.सुनिता पोटे नियोजन व विकास गृहनिर्माण समितीच्या सभापती स्वाती साठे महिला बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद उपसभापती स्वप्नाली जामदार सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचे अभिनंदन शिरूरकरांनी केल्या असून प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून शिरूर नगर परिषदेच्या नाव राज्यात केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करत शिरूर शहराचे असेच नाव देशपातळीवर न्यावे अशा शुभेच्छा दिलेले आहेत
महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ग्रामीण व नागरी क्षेत्रांसाठी राबविण्यात येणारा “माझी वसुंधरा अभियान” हा एकात्मिक आणि अनोखा उपक्रम आहे. या अभियानामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यावरण सुधारासाठी निसर्गाच्या पंचमहाभूतां—जल, अग्नी, आकाश, वायू व भूमी—अंतर्गत संभाव्य कृती बिंदू ओळखून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येतो. हे अभियान दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू करण्यात आले.
नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण, हवामान बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उपाययोजना राबविणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
“माझी वसुंधरा अभियान ५.०” हे दिनांक १ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आले. या टप्प्यात राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदविला.
अभियान कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात आले. या मूल्यमापनातील गुणांच्या आधारे २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये शिरूर नगरपरिषद हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच भूमी या थीमॅटिक घटकातही उच्चतम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिरूर नगरपरिषदेस राज्यात प्रथम क्रमांकासाठी रुपये ४ कोटी व भूमी थीमॅटिकमधील उच्चतम कामगिरीसाठी रुपये १.५० कोटी असे एकूण ५.५० कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.
नगरपरिषदेमार्फत भूमी घटकांतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण, बायो-मेडिकल कचरा व्यवस्थापन, व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्ले सह वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र उभारणी, फटाके बंदी जनजागृती इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. वाहतूक हे वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण असले तरी जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्यावर पर्यायी उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीसह आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
तसेच सण-उत्सव काळातील जलप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना, नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन, एलईडी पथदिव्यांचा वापर, विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम, सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसिद्धी, तरुणांचा सहभाग, पर्यावरण दूतांची निवड, शाळांचा पर्यावरण सेवा योजनेत सहभाग वाढविणे अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. राज्य व विभाग स्तरावर पुरस्कारांनी या कार्याची दखल घेण्यात आली.
मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, नगर रचनाकार पंकज काकड, अभियंता समाधान मुंगसे, तेजस शिंदे, रत्नदीप पालके, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, कर निरीक्षक माधव गाजरे, चाकणे, शितल काळे, कोल्हे, लेखापाल इचके, टोपे, शहर समन्वयक प्राची वाखारे तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता मुकादम, सफाई कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि शिरूर शहरातील नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले.
नागरिकांचा सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचे समन्वयित प्रयत्न आणि पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा मानाचा तुरा शिरूर नगरपरिषदेच्या शिरपेचात रोवला गेला आहे.


