राजकीयशिरूर तालुका

नमामी चंद्रभागा ‘ उपक्रमांतर्गत साकार होणाऱ्या सुशोभित गार्डनच्या भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार कटके यांच्या हस्ते संपन्न

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहराच्या सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केले .

शिरूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘ नमामी चंद्रभागा उपक्रमांतर्गत साकार होणाऱ्या सुशोभित गार्डनच्या भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार कटके यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

  1. या वेळी मुख्याधिकारी प्रीतम पाटील नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष  मितेश गादीया,बांधकाम समिती सभापती सुनील जाधव स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान, पाणी पुरवठा समितीचे सभापती डॉ. सुनिता पोटे नियोजन व विकास गृहनिर्माण सभापती स्वाती साठे महिला बालकल्याण सभापती आयेशा सय्यद, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सागर नरवडे, अमित  कर्डिले संतोष  थेऊरकर अमोल चव्हाण उमेश शेळके, निलेश पवार कलीम सय्यद नगरसेविका रिंकू जगताप  संगीता मल्लाव सुनीता  भुजबळ स्वीटी शिंदे , सविता राजापुरे, पूजा पोटावळे, चारूशीला कोळपकर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे आदी सह उपस्थित होते.

“नमामि चंद्रभागा” योजना अंतर्गत
शिरूर नगरपरिषद हद्दीतील स. नं. २६९ पै. व २७० मध्ये चंद्रभागा अभियान अंतर्गत शिरूर नगरपरिषद हद्दीतील नदीकाठच्या क्षेत्राची पर्यावरणीय पुनस्थापना आणि उद्यान विकास करणे व इतर अनुषंगिक कामे करणे कामी भूमिपूजन सोहळा दिनांक ०२ मार्च २०२६
घोडनदी किनारा (एसटीपी प्लांट शेजारी) पार पडला
आमदार कटके म्हणाले की नमामि चंद्रभागा या योजनेअंतर्गत शिरूर शहराच्या बाहेर असणाऱ्या घोडनदी या नदीच्या किनारी उद्यान विकसित होणार असून नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी तसेच नदी क्षेत्रातली पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा याची सुधारणा करण्यात येणार असून यामुळे शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे
या गार्डनमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरणात फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विरंगुळ्याची उत्तम सोय उपलब्ध होणार आहे.

शिरूरच्या विकासासाठी अशा सकारात्मक आणि लोकाभिमुख उपक्रमांची मालिका भविष्यातही अशीच सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधला.

यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी स्वागत केले तर आभार सुनील जाधव यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button