शिरूर तालुकासामाजिक

शिरूर नगरपरिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा व विशेष महिलांचा सन्मान

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा अश्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला असून तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सांगितले 

{

तसेच खास महिला भगिनींसाठी: खेळ पैठणीचा आणि ई-बाईक जिंकण्याची सुवर्णसंधी असून महिला व बालकल्याण विभाग शिरूर नगरपरिषद, घोडनदी आयोजित करत आहे आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त
एक भव्य आणि दिमाखदार सोहळा तसेच
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा अश्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
‘खेळ पैठणीचा’ प्रस्तुतकर्ते ओम यादव हा कार्यक्रम होणार आहे

घरातील लक्ष्मीचा सन्मान आणि आनंदाचा उत्सव या खेळात सहभागी होऊन भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना असून शहरातील महिलांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन पाचर्णे यांनी केले आहे

प्रथम पारितोषिक: 🛵 शानदार ई-बाईक (E-Bike)
द्वितीय पारितोषिक: ❄️ ब्रँडेड फ्रीज
तृतीय पारितोषिक: 📺 एलईडी टीव्ही (LED TV)

आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे कार्यक्रमासाठी ठेवण्यात आली असून हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता सेंटर शाळा मैदान जिजामाता उद्यान शेजारी होणार असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button