राजकीयशिरूर तालुका

पाचर्णे यांना दगा फटक्याची परंपरा कायम, ज्यांना मोठे केले त्यांनीच साथ सोडली

शिरूर प्रतिनिधी

शिरूर ग्रामीण न्हावरा जिल्हा परिषद गटात भाजपाच्या मालती ताई पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव झाला हा पराभव हा शिरूर पंचक्रोशी व न्हावरा गटातील काही नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून साहेबांनी ज्यांना मोठे केले त्यांनी गद्दारीची परंपरा पुढे चालू ठेवली अशी भावना त्यांनी व्यक्त करत पाचर्णे यांनी ज्यांच्यावर उपकार केले त्यांनी अशा रीतीने परतफेड केल्याने भविष्यात राजकारणात कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही अशी सुद्धा भावना नागरिकांमध्ये तयार झाली आहे

चार दशकापासून शिरूर तालुक्यात स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या नावाचे वलय होतं तसेच तालुक्याच्या राजकारणात त्यांनी अनेक पक्षाचे प्रवेश केला असला तरी त्यांची चाळीस वर्षांपूर्वी जोडलेली माणसं त्यांच्या शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होती राजकारण करताना शेवट पर्यंत यांनी कधी टोकाची भूमिका न घेता निवडणुकीपुरतं राजकारण करत पुन्हा एकदा मैत्रीचा हात जोडत त्यांनी सर्व समाज बरोबर ठेवला शिरूर शहर पंचक्रोशीत चाळीस वर्षापासून त्यांच्या नावाचा दबदबा होता कुठली निवडणूक असू बाबुराव पाचर्णे यांच्याशिवाय निवडणुका पुढे जातं नव्हत्या पंचायत समिती जिल्हा परिषद खरेदी विक्री संघ ग्रामपंचायत यामध्ये पाचर्णे सल्ला घेत जात होते मात्र पाचर्णे यांनी राजकारण करत असताना आपल्या घरातील सर्व व्यक्तींना राजकारणापासून लांब ठेवले तसेच त्यांच्या दोन टर्मच्या आमदारकीच्या काळात 2004 ते 2009 व 2014 ते 2019 या आमदारकीच्या काळात त्यांच्याकडे 2014 ते 19 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता असताना सुद्धा सत्तेचा दुरुपयोग न करता कोणालाही विनाकारण त्रास दिला नाही सत्तेच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय त्रास न देता आपलेसे केले हे विरोधही मान्य करत आहे. पाचर्णे यांच्या माध्यमातून लाखो रुपये कामवणारे आज त्यांच्या पत्नी ला पाडण्या साठी प्रयत्नाची परकाष्ठा करताना दिसत होते

 

 

 

एमआयडीसी मध्ये स्वतःच्या कुटुंबातील कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करत एमआयडीसीमध्ये शिरकाव करायचा नाही अशी एक समजच नातेवाईकांना दिली होती व एमआयडीसी मध्ये न जाता तुम्ही तुमचा व्यवसाय करा असे त्यांनी बजावले आज जे एमआयडीसीमध्ये जे मोठे झालेत पाचर्णे यांच्या सहकार्याने आज त्यांनीच पाचर्णे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी यांचा घात केला सत्तेत असताना पाचर्णे हे एमआयडीसीमध्ये काही पण करू शकत होते अनेक कंपन्यात ठेका कामे घेऊन लाखो रुपये महिन्याला कमवू शकत होते मात्र त्यांनी कुठल्याही परिस्थितीत एमआयडीसीत जायचं नाही असे स्वतःच्या कुटुंबातील लोकांना सांगितले व दुसऱ्या लोकांना मोठे केले त्या लोकांनी सुद्धा त्यांना तीन वेळा दगडफटका केला

 

 

स्वतःच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांची स्वतः सुपुत्र राहुल पाचर्णे यांना सुद्धा शिरूर पंचकोशी मधून दगा फटका झाला व त्यांचा पराभव झाला तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा स्व.आमदार बाबुराव पाचर्णे यांना पंचक्रोशी ने दगा फटका केला आज पाचर्णे हे हयात नाहीये त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या पत्नी मालती पाचर्णे या निवडणुकीच्या निमित्ताने त्या उभ्या होत्या राजकीय त्यांचे वारसदार थोडेसे चुकले असतील पण स्वतः स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी उभे असताना ज्यांना मोठे केले व कुठल्याही अडचणीच्या काळात शिरूर पोलीस स्टेशन अथवा तहसील कार्यालय किंवा कुठल्या शासकीय कार्यालयात एका फोनवर यांची काम केली आज त्यांनीच बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नीला पाडण्यासाठी पुढाकार घेतला ही सर्व खेदजनक गोष्ट असून निवडणूक येतील निवडणुका जातील मात्र या निवडणुकीत मालतीताई पाचर्णे यांचा पराभव म्हणजे स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पराभव आहे या निकालावरून दिसत असून राजकारणात ज्यांना पाचर्णे यांनी मोठे केले व मानाचे स्थान दिले आज त्यांनीच पाचर्णे यांचा घात केला हे मात्र तेवढेच खरे

 

राजकारणात वेळ कायम राहत नसते आज पराजय तर उद्या विजय हे सूत्र ठरले आहे पण राजकारण करत असताना स्वतःच्या घराची तमा न बाळगणाऱ्या स्व.माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नीचा पराभव करून त्यांच्या विचाराला स्वतः पाचर्णे यांचे कट्टर समर्थक म्हणणाऱ्यांनी तिलांजली दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button