शिरूर नगर परिषदेच्या वतीने पालखी मार्गाची पाहणी अडचणी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना

शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग महाराजांची यात्रा दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी पार पडणार असून दिनांक 14 रोजी रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान शिरूर शहरातून जुने शिरूर रामलिंग या ठिकाणी होत असते शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरापासून पालखीचे प्रस्थानदिनांक 14 रोजी दुपारी होते संपूर्ण शहरातून पालखी मार्गाने पालखीचे प्रस्थान होते

त्यासाठी शिरूर शहराची पालखी मार्गाची पाहणी शिरूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे उपनगराध्यक्ष मितेश गादिया, मुख्याधिकारी प्रीतम पाटील,नगरसेवक अभिजीत पाचर्णे,बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव,स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान,चेतन साठे,कलीम सय्यद, नगररचनाकार पंकज काकड बांधकाम विभागाचे प्रमुख समाधान मुंगसे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आदित्य बनकर स्वप्निल तरटे तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांच्यासह संपूर्ण शहराची पालखी मार्गाची पाहणी यावेळी करण्यात आली या या मार्गावर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सूचना दिल्या

यावेळी जैन स्थानक गल्लीतील गाड्या काढून घेणे
उर्दू शाळेबाहेरील स्वच्छता करणे
पाचकंदील चौक येथील बोर्ड, जाळी, BSNL पोल काढून घेणे
पालखी मार्गावरील BSNLचे सर्व पोल काढून घेणे
रामआळी येथील हापसा दुरुस्त करणे व दिशा बदलून घेणे
संपूर्ण पालखी मार्गावरील गवत, राडारोडा उचलून घेणे
नवकार कलेक्शन शेजारील राडारोडा उचलणे
हॉटेल नवनाथ चेंबर साफ करणे
मुळे हॉस्पिटल समोरील राडारोडा साफ करणे व कचरा कुंडी साफ करणे
पालखी मार्गावरील फुटपाथ स्वच्छ करून धुऊन घेणे
सरकारी दवाखाना जवळील सर्व गाड्या काढून घेणे (प्रसूतीगृह)
हॉटेल लजीज जवळील राडारोडा उचलणे
Co कॉर्टर समोरील चेंबर लाईन चेक करणे या सह 61 ठिकाणी पालखी मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे तसेच सूचना मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत


