राजकीयशिरूर तालुका

शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अविनाश मल्लाव यांची निवडणुकीतून माघार

शिरूर प्रतिनिधी

 

शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीतून शिरूर शहर विकासआघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अविनाश मल्लाव यांनी जाहीर केले.

 

 

 

 

मल्लाव म्हणाले,नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची आपली इच्छा होती.मात्र ज्या प्रभागात लढायचे तो प्रभाग महिला राखीव झाल्याने आपल्या पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होतो.धारीवाल यांच्याकडे याबाबत मागणीही केली होती.मात्र धारीवाल यांनी यावेळी निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याने हा विषय येथेच संपला.धारीवाल हे आमचे आदर्श तसेच प्रेरणास्थान असून त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदरपूर्वक स्वीकार केला आहे.

 

 

 

मी गेली २५ वर्ष सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने समाजात कार्यरत आहे.समाजकार्यासाठी राजकारण हा मार्ग नसून माझ्या दृष्टीने सेवाभाव महत्वाचा आहे.हीच माझ्या जगण्याची दिशा आहे.अशी भावना मल्लाव यांनी व्यक्त केली.

 

  1.  धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा सामाजिक सेवेचा प्रवास अखंडित व निःस्वार्थ भावनेने सुरू ठेवणार असून विवेक बुध्दीने मी या निवडणुकीतून माघार घेत आहे.वास्तविक माझ्या पत्नीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी आग्रह करण्यात आला.मात्र ज्यांना आदर्श मानतो त्यांनीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आपण निवडणुक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे मल्लाव यांनी सांगितले.आपल्यावर कोणाचाही दबाब नसल्याचेही मल्लाव यांनी स्पष्ट केले.या कालावधीत ज्यांनी सहकार्य केले त्या सहकारी,समर्थक तसेच कार्यकर्त्यांचे मल्लाव यांनी ऋण व्यक्त केले आहे.या सर्वांनी दिलेले प्रेम,विश्वास व साथ हीच माझी खरी संपत्ती असून या पुढेही कायम अशीच साथ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button