राजकीयशिरूर तालुका
शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अद्याप पर्यंत राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट नाही

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिरुर शहर विकास आघाडीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने शहराच्या राजकीय पटलावर काहीसा गोंधळ निर्माण झाला असताना शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारीवर अनेक जण अनेक इच्छुक अवलंबून होते मात्र त्यांची घोर निराशा झाल्याने आता सर्व लक्ष राजकीय पक्षाकडे लागलेले आहेत
शिरूर शहराचा इतिहास पाहिला तर भारतीय जनता पार्टी सोडली तर या ठिकाणी पक्षीय चिन्ह नगरपरिषदेच्या निवडणुकीत वापरले गेलेले नाही शिरूर शहर विकास आघाडी सह लोकशाही क्रांती आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे त्यामुळे शहरात राजकीय
अस्थिरता आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली वाट अपक्ष किंवा पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्यासाठी आपली तयारी सुरू केली आहे
शिरूर नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने आता यासाठी कुठला पक्ष आपली उमेदवारी जाहीर करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिरूर शहरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे महायुती तर्फे भारतीय जनता पार्टीचा इच्छुकांची मेळावा दिनांक दहा रोजी आयोजित केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दोन दिवसापूर्वी इच्छुकांची संपर्क साधत त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत तर शिवसेना शिंदे गट यांनी आपण महायुती बरोबर असून आमदार ज्ञानेश्वर कटके व भाजपचे राहुल पाचर्णे व नितीन पाचर्णे यांच्याशी आपलं बोलणं झालं असून जो काही महायुतीचा निर्णय होईल त्याप्रमाणे सन्मानपूर्वक जागा शिंदे शिवसेना मिळतील असा आशीर्वाद शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे मात्र महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप पर्यंत कुठल्याही ठोस निर्णय झालेला नाही
महाविकास आघाडी तर्फे माजी आमदार अशोक पवार हेच निर्णय घेतील त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे माजी आमदार अशोक पवार निवडणुकीत लढविण्याचे संदर्भात आपला निर्णय जाहीर करतील सध्या तरी महाविकास आघाडी कडून कुठली घोषणा किंवा मेळावा किंवा या निवडणुकी संदर्भात कुठल्याही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत लढाविण्या संदर्भात याबाबत दोन-तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल
दिनांक 10 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून दिनांक 17 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना एक दोन तीन दिवसात निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला निवडणूक लढवायची की नाही त्यामुळे दिनांक दहा पासून सर्व राजकीय पक्षांना यामुळे आपल्या भूमिका स्पष्ट करावे लागणार आहे


