राजकीयशिरूर तालुका

शिरूर नगरपरिषदेच्या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप

इच्छुक उमेदवारांनी घेतला आक्षेप

शिरूर प्रतिनिधी

 शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम जाहीर झाल्यानंतर सुद्धा अनेक घोळ मतदार यादीत दिसून येत असून अनेकांची वास्तव्य असलेल्या चाळीस वर्ष ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात गेलेली आहे त्यामुळे याच्यामागे कोणाचे षडयंत्र आहे का याबाबत शिरूर शहरात उलट सुलट चर्चा सुरू असून या निवडणुकीत संदर्भात मतदार यादीत बाबत तीव्र नाराजी इच्छुक उमेदवारांनी केली आहे
शिरूर नगरपरिषदेच्या मतदार यादीतील घोळा संदर्भात मुदत वाढीनंतर सुद्धा मतदार यादी अद्यावत करण्यात आली मात्र 31 रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रभागात दुसऱ्या प्रभागातली नावे आले असून त्या नागरीकाचा त्या प्रभागाची काही संबंध नसताना सुद्धा ती नावे  त्या प्रभागात आली असून ही नाव कशी आली याबाबत सांशकता असून याच्या पाठीमागे काही ठेकेदार आहेत की काय अशी चर्चा शिरूर  शहरात सुरू आहे
याबाबत माहिती घेतली असता प्रभाग क्रमांक चार मधील मतदार यादीत अनेक मतदार यादी मतदारांची नाव गायब आहेत फक्त वय व मतदार क्रमांकाचे तसेच या प्रभागातील गेल्या अनेक वर्षांपासून राहणारी नागरिक तिथे अनेक वर्षापासून तिथेच मतदान करत आहे ते मात्र नावे प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेलेली आहे तसेच सुरज नगर मधील काही राहणारे नागरिक चे अनेक वर्ष सुरजनगर म्हणजे प्रभाग क्रमांक चार मध्ये मतदान करतात त्यांची नावे प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेलेली आहे ही नाव कशी गेली कोणाच्या सांगण्यावरून गेली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली असून
हा घोळ एका प्रभागा नुसता मर्यादीत नसून अनेक प्रभागात हीच परिस्थिती आहे मतदार एका  ठिकाणी राहतो एका प्रभागात नाव व दुसऱ्या प्रभागात अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी मतदान करत असताना ही नाव व दुसऱ्या प्रभागात गेलीच कशी त्याच्यामागे काय कारण आहे याचा उलगडा अद्याप पर्यंत न  झाल्याने भविष्यात याचा परिणाम निवडणुकीवर होणार असून काही ठेकेदार आपल्या मर्जीतले नगरसेवक हवेत म्हणून तर हे काम करत नाही ना अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू असून याची सविस्तर चर्चा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे
अभिजीत  पाचर्णे मा. नगरसेवक
 माझ्या प्रभाग क्रमांक चार मधील मतदार यादी पाहत असताना या मतदार यादीत अनेक माझ्या अनेक मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये टाकण्यात आले असून तसेच  मतदार यादीत अनेक मतदारांची नावे नाही फोटो फक्त नंबर आणि वय एवढेच आहे अनेक मतदारांची वय 99 च्या पुढे आहेत अशा मतदारांना शोधून देणाऱ्यांना मी जाहीर बक्षीस देणार आहे असं आवाहन अभिजीत पाचर्णे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button