
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरात मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने चांगल्या कामांना प्राधान्य दिले जात असून समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या कामगारांचा सन्मान करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असून गेल्या अनेक वर्षापासून मातोश्री प्रतिष्ठान हा सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल समाजाला एक आदर्श घालून दिला असल्याचे मत शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी व्यक्त केले आहे
मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर नगर परिषदेतील वॉलमन यांचा सन्मान प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर म्हणाले की गेले 28 वर्षांपासून मातोश्री प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवीत आहे ऊन वारा पाऊस ह्या परिस्थितीत असताना सुद्धा शहराला पाणीपुरवठा नियमित करणारे हे वाल्मन यांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे आंबेकर म्हणाले
समाजासाठी पोलीस होमगार्ड वॉलमन आदीचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला असून किल्ले स्पर्धा गौरी गणपती स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान राबवत असून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी आंबेकर म्हणाले
शिरूर नगरपालिका वॉलमनरामदास शांताराम माशेरे,बाळासाहेब किसन पुंडे,मंगेश ज्ञानेश्वर शिरसागरप्रमोद फकीरचंद मल्लाव,अक्षय हरिश्चंद्र मल्लाव,तुषार वसंत मस्के,बाळासाहेब शिवाजी वर्पे आदी चा सन्मान करण्यात आला
यावेळी नगररचनाकार पंकज काकड पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आदित्य बनकर भूषण कडेकर आदी उपस्थित होते मातोश्री प्रतिष्ठान च्या वतीने शैलेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले


