पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
वंचित नागरीकांना आधार कार्ड मिळावे उबाठा पक्षाची मागणी

शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील अठरा वर्षाच्या पुढील वंचित नागरीकांना आधार कार्ड मिळावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे
यासंदर्भातील एक निवेदन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की शिरूर तालुक्यातील अनेक गावात अठरा वर्षाच्या पुढील अनेक गावात महिला युवक नागरीक आधार कार्ड पासून वंचित आहेत नागरीक जेव्हा नागरी सुवीधा केंद्रावर आधार कार्ड काढण्यासाठी जातात तेव्हा आम्ही फक्त अठरा वर्षाखालील मुलांचे आधारकार्ड काढतो असे सांगून नागरीकांना त्रास दिला जातो तरी तहसीलच्या वतीने गावा गावात कॅम्प घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
या वेळी गणेश जामदार अनिल पवार योगेश ओव्हाळ उपसरपंच अनिल पवार आबासाहेब गवळी नितीन गवळी उपस्थित होते



