राजकीयशिरूर तालुका

नगराध्यक्ष पदासाठी कोण होऊ शकतात संभाव्य उमेदवार

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले असून ओबीसी महिला प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झाले असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची चर्चा शिरूर शहरात रंगू लागली आहे
शिरूर नगर परिषदेवर जवळपास 2011 पासून महिला राज असून 2011 ते 16 यावर्षी दरवर्षी एक महिलेला संधी म्हणून नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला मात्र राज्य शासनाच्या निर्णयानंतर 2016साली जनतेतून नगराध्यक्ष ही संकल्पना पुढे आल्याने पुन्हा एकदा 2016साली शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण आल्याने त्यावेळेस सुद्धा महिलेसाठी नगराध्यक्ष पद गेले पाच वर्षानंतर निवडणूक होणे अपेक्षित असताना काही कारणाने निवडणूक पुढे गेली व आज जवळपास चार वर्षानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक व नगरसेवक पदाची निवडणूक होत आहे मात्र पुन्हा एकदा ओबीसी प्रवर्गासाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने माजी नगरसेविकांमध्ये सुद्धा या संदर्भात नावाची चर्चा सुरू झाली आहे
शिरूर नगर परिषदेवर 2007 पासून प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे त्यामुळे ते ठरवतील त्यांनाच शिरूर शहर विकासासाठी उमेदवारी मिळू शकते त्यांनी आपली भूमिका जरी स्पष्ट केली नसली तरी भविष्यात शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात ते आपली भूमिका स्पष्ट करतील आणि त्यांच्या शिरूर विकास आघाडी कडून नगराध्यक्षपदाची कोण उमेदवार असेल हे मात्र सध्या तरी सांगणे कठीण आहे
आरक्षण जाहीर झाल्यानंतर ची संभाव्य नाव येत आहेत शिरूर विकास आघाडी कडून त्यात माजी उपनगराध्यक्ष अलका सुरेश खांडरे,माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्या पत्नी ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे,माजी नगरसेवक विठ्ठल पवार यांच्या पत्नी  रोहीणी विठ्ठल पवार, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख मयूर थोरात यांच्या पत्नी व  माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात,जिजामाता बँकेच्या उपाध्यक्ष व माजी नगरसेविका सुरेखा संतोष शितोळे तर माजी नगराध्यक्ष सुवर्णा राजेंद्र लोळगे व  उद्योजक किरण पठारे यांच्या पत्नी प्रज्ञा  किरण पठारे
 सध्या ही नावे चर्चेत असून यापैकी एक नाव निश्चित होऊ शकते अशी चर्चा शिरूर शहरात सुरू आहे
मात्र आगामी काळातच कळेल विकास आघाडी कडून कुठला चेहरा समोर येत आहे नगराध्यक्ष पदासाठी कुठला चेहरा समोर येत आहे मात्र यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असे राजकीय जानकारांचे मत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button