गुन्हेगारीशिरूर तालुका
किरकोळ वादातून खून; दोन तासांत आरोपींना अटक — रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

शिरूर प्रतिनिधी
कारेगाव ता. शिरूर येथे किरकोळ वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी केवळ दोन तासांत अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता यशईन चौक, कारेगाव येथे मोहम्मद शकील मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिध्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी (दोन्ही रा. यशईन चौक, कारेगाव, ता. शिरूर, मूळ रा. नांदेड) हे पायी जात असताना ओंकार वाळके व त्याचा साथीदार यांच्या स्कुटीचा धक्का लागला. या किरकोळ वादाचे कारण मनात धरून आरोपींनी दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता दोघांच्या राहत्या घरात घुसून लाकडी दांडके, प्लास्टिक पाईप व हाताने मारहाण केली. यात सिध्दीकी मोहम्मद यांचा मृत्यू झाला, तर शकील मोहम्मद गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी शकील यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यानंतर आरोपी पळून गेले होते.अप्पर पोलीस अधीक्षक
रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी
प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सहा फौजदार दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरु करून गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपी १) ओमकार सिताराम वाळके (रा. कारेगाव) व २) विजय ज्ञानेश्वर जगधने (रा. कारेगाव) यांना अटक केली. तपासात दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
जखमी मोहम्मद शकील यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिवाजी मुंढे, निळकंठ तिडके, तसेच सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, . ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, विजय सरजिने, वैजनाथ नागरगोजे, योगेश गुंड, गणेश वाघ, प्रविण पिठले, किरण आव्हाड यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करीत आहेत.


