राजकीयशिरूर तालुका
रांजणगाव गणपती व कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी जय महाकालेश्वर उज्जैन येथे भव्य अशी मोफत दर्शन यात्रा

शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव गणपती व कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी जय महाकालेश्वर उज्जैन येथे भव्य अशी मोफत दर्शन यात्रा ज्योतीताई मानसिंग पाचुंदकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
रांजणगाव गणपती व कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी ही एक मोठी पर्वणी असून भव्य अशी दर्शन यात्रा उज्जैन येथील महाकालेश्वर देवाला दर्शन करण्यासाठी अत्यंत सुंदर व नियोजित ही अशी भव्य यात्रा आयोजित केली असून दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भव्य अशी स्लीपर कोच स्पेशल रेल्वे ही भाविकांसाठी ठेवण्यात आली असून या मोफत दर्शन यात्रेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड व दोन फोटो असे लागणार असून ही नाव नोंदणी राजमुद्रा ऑफिस,राजमुद्रा चौक रांजणगाव गणपती येथे सुरू असून या मोबाईल नंबर वर 9922882944 व 9765641717 माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन मानसिंगभैय्या पाचुंदकर यांनी केले आहे


