शिरूर तालुकासामाजिक

नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे नगरपरिषदेचे आवाहन

शिरूर प्रतिनिधी 

डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून या मोठ्या विसर्गामुळे घोडनदीला पुरस्थिती सारखी परिस्थिती झाली असून घोडनदीवर असणाऱ्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातून शिरूर शहराला पाणी पुरवठा होत आहे मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे पाणी गढूळ येऊ शकते त्या मुळे नागरिकांनी पाणी उकळून  व गाळून प्यावे असे आवाहन शिरूर नगर परिषद च्या वतीने करण्यात आले आहे 

 

जाहीर आवाहन 

नगरपरिषदेमार्फत सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे घोडनदीतील पाणीपातळी वाढली असून नदीचे पाणी गढूळ झालेले आहे.

 

 

 

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते की, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button