राजकीयशिरूर तालुका

साकळाई उपसा सिंचन योजनेचा फेर अभ्यास करुन स्थगिती द्यावी

शिरूर प्रतिनिधी

 

शिरुर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांना घोडधरण मूळ लाभार्थी बचाव समितीच्या  वतिने निवेदन देण्यात आले,घोड धरणावरुन अहिल्यानगर जिल्हयातील नगर तालुक्यासाठी होत असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजने मार्फत ३२ गावांसाठी साकळाई उपसा सिंचन योजनेस शासनाने मंजूरी दिली आहे,अजून प्रशासकीय मान्यता मिळाली नसून आपणांस आम्ही या निवेदनाव्दारे विनंती करतो की,सदर विषयाची कल्पना आपणांस आहे,परंतू ही योजना जर कार्यान्वित झाली तर घोड धरणावरील उजव्या कालव्यावरील अवलंबून शिरुर तालुक्यातील गावे व डाव्या कालव्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील गावे लवकरच जिरायती होणार आहेत. तसेच सदर योजनेपासून अहिल्यानगर जिल्हयातील ३२ गावांनाही पाणी मिळण्याची शाश्वती नाही,कारण हे धरण उन्हाळयात एप्रिल नंतर तळ गाठते,यामुळे सदर निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

 

तरी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपले जिल्हयाचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेमार्फत सदर साकळाई उपसा सिंचन योजनेचा फेर अभ्यास करुन सदर योजनेस स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आली,त्याप्रसंगी अनिल पवार,श्रीनिवास घाडगे,सुधीर फराटे,संतोष काळे,कैलास पवार,दिपक पवार,सुनिल खळदकर,उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button