शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे
शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीच्या प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा दि. १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर प्रारूप प्रभाग रचनेवर दि.१८ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांकडून प्रारूप रचनेवरील हरकती व सूचना लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिरूर शहरातून कार्यालयास एकूण ०८ हरकती प्राप्त झाल्या होत्या.
सदरील प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दि.०३/०९/२०२५ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरील सुनावणीसाठी व आपले म्हणणे मांडणेकामी उपस्थित राहण्यासाठी नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आले होते. सदरील हरकती व सुचनावर सुनावणी घेतले नंतर विभागीय आयुक्त यांचे कडून 25/09/2025 रोजी मान्यता मिळालेली आहे.
दि. 29/09/2025 रोजी अंतिम प्रभाग रचना शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे असे शिरूर नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे


