शिरूर तालुकासामाजिक

शिरूर शहरातील युवा नेतृत्व आदित्यशेठ धारीवाल

शिरूर (अभिजीत आंबेकर संपादक ama9 न्यूज )

शिरूर शहराच्या जडणघडणीत अनेक कुटुंबांच्या हात असला तरी शिरूर शहरातील धारिवाल कुटुंबीयांचा या शहराच्या जडणघडणीत व ऐक्यात सामाजिक बांधिलकीत तसेच शहरातील शांतता जातीय सलोखा ठेवण्यात सिंहाचा वाटा आहे

 

हे मी या कारणाने सांगतो की या लेखाद्वारे आपण आज युवा उद्योगपती व युवकांचे आशास्थान शिरूर नगरीचे भूषण आदित्यशेठ प्रकाश भाऊ थारिवाल यांचा आज वाढदिवस दिनांक 27 सप्टेंबर 2001 रोजी आदित्य धारिवाल यांचा जन्म झाला आज 27 सप्टेंबर 2025 रोजी ते 24 वर्ष पूर्ण करून 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने एक धारिवाल परिवारासाठी विश्लेषण किंवा शुभेच्छा द्याव्यात या अनुषंगाने हे मी माझे म्हणणं मांडत आहे

प्रथम युवा नेतृत्व युवा उद्योजक आदित्य शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपण सर्व जाणता की शिरूर शहरातील धारिवाल कुटुंबीयांची ही चौथी पिढी शिरूर शहराच्या जडणघडणीत व राजकारणात धारिवाल कुटुंबियांचे यापूर्वी तीन पिढ्या कार्यरत झाल्या यात स्वर्गीय माणिकचंद धारिवाल, स्वर्गीय रसिकभाऊ धारिवाल व सध्याचे नगरीचे माजी नगराध्यक्ष व जागतिक कीर्तीचे उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल आणि आता चौथी पिढी ही आदित्य धारिवाल यांच्या रूपाने शिरूर शहराला लाभली आहे

 

आदित्य शेठ धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एकच असा विश्लेषण करता येईल की शिरूर शहरातील भविष्यातील शांतता जातीय एकता हा जर कायम ठेवायचा असेल तर धारीवाल कुटुंबाची शिरूर शहराला गरज आहे आणि आदित्य धारिवाल सध्यातरी राजकारणात दिसत नसले तरी त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना शिरूर शहराकडे लक्ष द्यावे लागेल

 

स्वर्गीय रसिकभाऊ धारिवाल यांचे प्रकाशभाऊ धारीवाल यांनी शिरूर शहराच्या राजकारणात येऊ नये असे त्यांचे मत होते स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल यांनी सुद्धा प्रकाशभाऊ धारिवाल यांना राजकारणासाठी विरोध केला होता मात्र 2007 साली सर्वसाधारण पदासाठी नगराध्यक्ष खुले झाल्याने शिरूर शहरातील सर्वांनी रसिकभाऊ यांचे मन वळविले व शिरूर शहराच्या राजकारणात प्रकाशभाऊ धारीवाल यांचा प्रवेश झाला 2007 पासून ते 2021 पर्यंत त्यांची सत्ता शिरूर नगरपरिषदेवर राहिली आहे

 

 

आपण अशी माणसं पाहिली आहेत की ते मोठे उद्योगपती झाले तिचे स्वतःच्या गावाला विसरून जातात त्यांचे वास्तव्य परदेशात किंवा मोठ्या शहरात राहते मात्र धारिवाल कुटुंब याला अपवाद आहेत ते जगप्रसिद्ध उद्योगपती होऊन सुद्धा त्यांनी आपली शिरुर शहराची नाळ सोडली नाही प्रभू श्री रामलिंग महाराजांवर अफाट श्रद्धा असलेल्या या धारिवाल कुटुंबियांनी व्यवसायानिमित्त कुठेही जरी असले तरी रामलिंग महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ते आवर्जून येत असत आजही त्यांनी शिरूर शहराची साथ न सोडता शिरूर शहराला आपलेसे करत शिरूर शहरच हे आमचे मूळ गाव आहे हे सर्वच सांगत आहेत

 

 

आदित्यशेठ धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुद्धा हीच परंपरा पुढे चालविली आहे आदित्य धारिवाल यांचे शिक्षण जरी शहरात झाले असले तरी ते आजही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शिरूर शहरातील महाशिवरात्र असू द्या इतर धार्मिक सण असू द्या किंवा चातुर्मास असू द्या कुठल्याही सणांना ते शहरात हजेरी लावून त्यात सहभाग घेतात व आपण शिरूर शहराशी जी आपली कर्मभूमी आहे यांना ते विसरले नाहीत आदित्यशेठ धारीवाल यांच्यात एक वैशिष्ट्य आहेत की त्यांच्यात त्यांचे आजोबा स्वर्गीय रसिकभाऊ धारिवाल यांची प्रतिमा दिसत आहे तसेच स्वर्गीय रसिकभाऊ धारिवाल होते त्याप्रमाणे आदित्यशेठ धारिवाल यांचे पाऊल पडत असून शिरूर शहराला भविष्यातील एक चांगला तरुण वर्गात लोकप्रिय होणारा व्यक्तिमत्त्व म्हणून लाभणार आहे

 

 

 

आदित्यशेठ यांनी एका कार्यक्रमात सांगितले की मला राजकारणापेक्षा समाजकारणात आवड आहे समाजकारण करायला मला आवडतं माझं कुटुंबीय हे सुद्धा समाजकारणात असून जे शिरूरकरांनी आमच्या धारीवाल कुटुंबीयांवर जे प्रेम केल आहे त्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले मात्र आदित्यशेठ धारीवाल यांचीही ही सुरुवात असून अवघ्या 24 व्या वर्षी त्यांच्यात एक परिपक्वता दिसत असून आज जरी त्यांना समाजकारण आवडत असले तरी भविष्यात शिरूर शहराला आदित्य धारिवाल यांच्या रूपाने एक चांगले व्यक्तिमत्व असलेले एक तरुण नेतृत्व मिळाले तर आश्चर्य वाटायला नको

 

 

 

शिरूर शहराला एकसंध जर ठेवायचा असेल तर भविष्यात धारीवाल कुटुंबिया शिवाय पर्याय नाही त्यामुळे भविष्यातील शिरूर शहरात युवा नेतृत्व आदित्य धारीवाल यांनी करावे अशी अनेक तरुण वर्गाची इच्छा आहे अजून त्यांनी शहरासाठी एक चांगले काम करावे व शहराला जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा चमकावे अशी प्रभू श्री रामलिंग चरणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो
धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button