खुशी मितेश गादिया हिला राज्यस्तरीय पारितोषिक

शिरूर प्रतिनिधी
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आर.एम धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल,शिरूर यांच्या वतीने शिरूर येथे भव्य राज्यस्तरीय नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धेत विविध शाळेने भाग घेतले होते. सदर नाट्य छटा स्पर्धेसाठी 4 गट करण्यात आले होते.
पहिल्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल शिरूर येथील कु.खुशी मितेश गादिया हिला राज्य स्तरीय चे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ह्यावेळी नाट्य छटा परिषदे चे संचालक आयुब खान (पुणे),दिपक घारु,शिरूर शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , आर एम धारिवाल स्कूल चे मुख्यधापिका अश्विनी घारु ,यांसह आदी मान्यवरांच्या हस्ते कु. खुशी मितेश गादिया हिला राज्य स्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच रोख रक्कम देण्यात आले. कु. खुशी मितेश गादिया हिला राज्य स्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्या बद्द्ल तिचे विविध स्तरातून अभिनंदनाचे वर्षाव करण्यात आले.


