शिरूर तालुकासामाजिक

शिरूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार

लहुजी शक्ती सेनेच्या मागणीला यश

 

शिरूर (प्रतिनिधी) –

 

शिरूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीच्या अनुषंगाने शिरूर नगरपरिषद प्रशासकीय ठराव मंजूर करून शिरूर नगर परिषदेतील विकास आराखड्यातील सर्वे नंबर ११३२ येथील आरक्षण क्रमांक 26 मधील 0.35 आर पैकी 0.15 आर इतक्या क्षेत्राचा स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी प्रशासकीय ठराव मंजूर केला असल्याचे माहिती लहुजी शक्ती सेनेचे राज्य सहसचिव दादाभाऊ लोखंडे यांनी दिली

 

नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात 0.15 आर इतके क्षेत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांस्कृतिक भवन उभे करण्याकरता आगाऊ ताबा मिळावा या साठी पत्र शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेले आहे

दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी राज्य सहसचिव दादाभाऊ लोखंडे यांनी 18 जुलै 2024 रोजी शिरूर नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केले होते हे उपोषण चार दिवस चालले होते या उपोषणाच्या वेळी नगरपरिषद या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आले होते की स्मारकासाठी नगरपरिषद जागा उपलब्ध करून देईल त्या अनुषंगाने हे पत्र मिळाले असून लवकरात लवकर स्मारकाचे काम सुरू होईल असा आशावाद लोखंडे यांनी व्यक्त केला आहे

 

याबाबत राज्य सहसचिव दादाभाऊ लोखंडे यांनी सांगितले की लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. या होती. दरम्यान 19 सप्टेंबर रोजी शिरूर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ व नगर रचनाकार पंकज काकड यांची लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे भेट घेऊन याबाबत दोघांशी चर्चा केली यावेळी पंकज काकड यांनी आश्वासन दिले की, शिरूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे राज्यसहसचिव दादाभाऊ लोखंडे नितीन घोडके पप्पू साठे विशाल जोगदंड भाऊसाहेब जाधव सोमनाथ साबळे मोनिका जाधव अनिकेत हजारे आदी उपस्थित होते

 

या निर्णयामुळे सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना असून, लहुजी शक्ती सेनेच्या संघर्षास अखेर यश आले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button