शिरूर मध्ये राजकीय कलगीतुरा,कोणाचा नाद तर कोणाचा सत्कार
नागरिकांच्या प्रश्नावर सर्वांची चूपी

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेच्या निमित्ताने शिरूर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात कलगीतुरा रंगला असून दोन्ही बाजूनी नगर परिषदेच्या निमित्ताने आंदोलन करण्यात आली मात्र या आंदोलनाचा नेमका फायदा कोणाला असा प्रश्न नागरीकांनी विचारला असून नागरिकांचे प्रश्न मात्र अजूनही तसेच प्रलंबित आहे राजकीय अस्तित्वासाठी हे आंदोलन चालले आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिरूर नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवटीत चाललेल्या कामाच्या विलंबामुळे महाविकास आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आली मात्र या आंदोलनात राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस येथेही पक्ष सामील झाले होते आंदोलन राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले यावेळी त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले व शहरातील विविध प्रश्नांचा संदर्भात आवाज उठविला हे प्रश्न लवकर मार्गी लागावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इचारा दिला
यावर शहरात महायुतीचे शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुज्जफर कुरेशी हे तीन वेळा नगरसेवक राहिले असून स्वतः अनेक समितीचे सभापती होते मात्र ते सत्ताधारी असून सुद्धा त्यांना आंदोलन करण्याची वेळ का आली याचा अर्थ त्यांनी सत्ते मध्ये असताना काहीच काम केले नाही असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. महाविकास आघाडीच्या घंटानाद आंदोलनानंतर महायुतीकडून मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांचा सत्कार करण्यात आला आणि घंटानात आंदोलनाला सत्काराच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले मात्र आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीचा कलगीतुरा नागरिकांना दिलासा देणार की त्यांची करमणूक होणार हा हे आगामी काळातच ठरेल पण स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी चाललेली ही धडपड पाहता गेल्या चार वर्षात प्रशासकीय राजवटीत कुठलं आंदोलन नागरिकांच्या प्रश्नासाठी झाले नाही हे सुद्धा नागरिक विसरलेले नाही शहरात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत मात्र याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे अनेक नागरिकांनी बोलून दाखवले
चौकट
महायुतीतील व महाविकास आघाडीतील भांडणे ही नागरिकांच्या प्रश्नासाठी असली तर नवल वाटायला नको मात्र प्रशासकीय राजवटीत नगर परिषदेतील कामाचे ठेके व त्यात असलेला हा सहभाग मिळवण्यासाठी ही चाललेली धडपड असून तसा प्रसासाकीये राजवटीत सर्व मैदान खुले असल्याने त्यामुळे अनेक नवीन ठेकेदार व नगरपरिषदेतील काही अधिकारी यांची अभद्र युती या वादाला कारणीभूत असल्याचे नगर परिषदेच्या परिसरामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे
चौकट
सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी सत्ताधारी महायुतीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक हे नगर परिषदेच्या प्रांगणात दिसत असून अनेक विभागात त्यांचा वावर वाढलेला आहे याबाबत नगरपरिषदेच्या आवारात दबक्या आवाजात चर्चा झाली असली तरी या वादाला नगरपरिषदे मिळणारे काम हेच कारणीभूत असल्याचे काही राजकीय जाणकारांनी सांगितले सध्या सुरू असलेल्या अनेक कामांची चौकशी होऊन ते काम कुठल्या ठेकेदाराला दिले आहे त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे


