शिरूर तालुकासामाजिक
शेतीला व्यवसायचा दर्जा द्या – महेश डोके

शिरूर प्रतिनिधी
दि 1 जुलै स्व वसंतराव नाईक जयंती निमित्ताने संपूर्ण राज्यात कृषी दिन साजरा केला जातो कृषी क्षेत्रात हरीतक्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जात अन्नधान्य मध्ये राज्याला स्वयंपूर्ण करण्यात वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान राहिले त्या अनुषंगाने त्यांच्या जयंती निमित्ताने शिरूर पंचायत समिती येथे कृषि दिन साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी महेश डोके उपस्थिती होते.
पंचायत समिती शिरूर व तालुका कृषी अधिकारी शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक/कटके यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर यांनी विविध पिकावर येणाऱ्या लष्करी अळी चा प्रादुर्भाव बाबत माहिती दिली. लष्करी अळीची ओळख, नुकसानाची पातळी व नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांंनी ऊस लागवड तंत्रज्ञान यांनी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले लागवडीच्या पध्दती, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, बेणे निवड, बेणे प्रक्रिया, बाळ बांधणी, मोठी बांधणी, किड व रोग नियंत्रण बाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली तसेच कांतीलाल नलगे यांनी सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात खरीप व रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या पिक स्पर्धा योजनेतील विजयी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला

कार्यक्रमासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी राम राठोड, विस्तार अधिकारी (कृषी) संतोष सोनटक्के, अंकुश जाधव मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील संपत कंठाळे, कोमल हिरडे उपस्थित होते तसेच तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी सह शेतकरी उपस्थित होते. भिमराव गाजरे, मिनीनाथ देशमुख, तुकाराम कोकडे, मारूती भोसले, संजय बळवंत सोनवणे, शिवाजी सरड, ऋतुराज देव, दत्तात्रय लोखंडे, भाऊसाहेब पळसकर, राजेंद्र गिरमकर, ज्ञानेश्वर काळे, उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी तर आभार कृषी अधिकारी दिनेश आरसुळ यांनी मानले


