शिरूर तालुकासामाजिक

मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न

शिरूर प्रतिनिधी

 

सध्याच्या युगामध्ये मुलांना इतिहास कळणे गरजेचे असून इतिहासामध्ये गड किल्ल्यांना किती महत्त्व होते हे नवीन पिढीला त्याचे महत्त्व कळण्यासाठी व ते कायमस्वरूपी त्यांना लक्षात राहण्यासाठीकिल्ले स्पर्धा भरवणे ही काळाची गरज असल्याचे मत शिरूर नगर परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती अभिजीत पाचर्णे यांनी व्यक्त केले

 

मातोश्री कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने 2024 यावर्षी किल्ले स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे व श्रीकृष्ण उद्योग समूहाचे उद्योजक सागर नरवडे यांच्या शुभहस्ते पार पाडला

 

या वेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर, पत्रकार सतीश धुमाळ,मुकुंद ढोबळे, शैलेश जाधव, सतीश केदारी, प्रमोद वाघचौरे, साजिद शेख, किरण आप्रे आदीसह बक्षीस मिळवलेले व या स्पर्धेत सहभागी घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते

 

 

यावेळी श्रीकृष्ण उद्योग समूहाचे सागर नरवडे यांनी सांगितले की मातोश्री प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात किल्ले स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात भरवण्यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहित करावे व या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्या किल्ल्यांचे महत्त्व या बाळगोपाळांना कळण्यासाठी अशा स्पर्धा ह्या मोठ्या प्रमाणात भरल्या पाहिजेत त्यासाठी श्रीकृष्ण उद्योग समूह कायमच पुढे राहील कायमच पाठिंबा देईल असे मत सागर नरवडे यांनी व्यक्त केले यांनी व्यक्त केले.

या किल्ले स्पर्धेत पन्नास हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक युवा संघर्ष गणेश मंडळ मुंबई बाजार तर द्वितीय क्रमांक सायेशा आढाव तृतीय क्रमांक काव्या बाफना चतुर्थ क्रमांक सिद्धांत मुथा पाचवा क्रमांक सिद्धार्थ पठारे व सहावा क्रमांक श्रुती डहाळे असे या स्पर्धेत बक्षीस मिळवल्यांची नावे असून प्रत्येक स्पर्धेत भाग घेणाऱ्याला एक सन्मानचिन्ह यावेळी देण्यात आलेले आहे

यावेळी स्वागत शैलेश जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश धुमाळ यांनी केले तर आभार सतीश केदारी यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button