शिरूर तालुकासामाजिक
नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावे नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले

शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे
याबाबत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून या निवेदनात असे म्हटले आहे की शिरूर शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करणेत येते की, शिरूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यातून शहरास पाणीपुरवठा करणेत येतो. घोडनदी येथून येणारे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये गढूळ येत असून, खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे.
तसेच ज्या नळकनेक्शनधारकांनी नळाला तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, पाणी साठविणेच्या टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात, रस्त्यावर पाणी सोडू नये, पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी व पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, ही नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात आले आहे


