गुन्हेगारीशिरूर तालुका

अवैध दोन गावठी बनावटीची पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणा-यास अटक

शिरुर प्रतिनिधी 

 अवैध दोन गावठी बनावटीची पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणा-यास रामलींग परिसरामधुन एकास  बेडया ठोकल्या असुन  शिरूर तपास पथकाने  धडाकेबाज कारवाई  केली आहे .

दिनांक १५ जुन  रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,  रामलींग ता शिरूर जि पुणे येथे शिरूर ते रामलींग रोडचे बाजुला रूद्र टाईल्स दुकानाचे शेजारी  प्रदिप श्रीकिसन तिवारी रा शिरूर ता शिरूर जि पुणे हा गावठी पिस्तुल घेवुन फिरत असलेबाबत बातमी मिळाल्याने   पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे यांनी तात्काळ पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांचे पथक तयार करून सदर ठिकाणी जावुन खातरजमा केल्या नंतर
पुणे शिरूर रामलींग रोडने रूद्र टाईल्स दुकानाचे शेजारून इसम नामे प्रदिप श्रीकिसन तिवारी, वय ४२ वर्ष, रा साईनगर, बी जे हाउसींग सोसायटी शिरूर ता. शिरूर जि.पुणे यास सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले असता त्याचेकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे मिळुन आली. सदरची अग्निशस्त्रे गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आली आहेत. सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन मध्ये  भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक  शुभम चव्हाण करीत आहेत. आरोपी नामे प्रदिप श्रीकिसन तिवारी यास  दिनांक १६ जुन  रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक १८ जुन  रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  संदिपसिंग  गिल्ल  अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले  पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक  शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button