पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महागणपतीस अभिषेक

शिरुर प्रतिनिधी
पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मंदिरात पहाटे लहान मुले व मुली यांच्या शुभहस्ते अण्णांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून श्री चरणी अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड करण्याचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी उपस्थित त्यांना लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 या पुस्तकाचे तसेच वृक्ष संवर्धनासाठी वॉटर एप्पल या वृक्षाचे वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य विभागात शिक्षण घेणाऱ्या महा विद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
तालुक्यातील आदिवासी या समाजातील विशेष करून पारधी समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वह्या, पुस्तके, दप्तर ,पेटी इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले . याच समाजातील अनेक भिक्षा मागून आपले जीवन जगत आहेत, याकरिता संपूर्ण शिरूर तालुका भिक्षामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. याकरिता शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्याना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर प्रौढ भिक्षेकरी यांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी सहयोग करणार आहे.
यावेळी  शिवाजीराव खेडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी ह भ प संतोष महाराज खेडकर (भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे) येथील विद्यार्थी, मेजर तुकाराम डफळ, आदिवासी वंचित समाजाचे नेते हिरालाल भोसले , हर्षवर्धन पवार, रवींद्र उंद्रे, सोमनाथ मोरे ,गणेश सातव, रामदास बत्ते, प्रकाश पवार ,निलेश शिंदे, देविदास ढोबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन थोरात यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तुषार कुटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button