राजकीयशिरूर तालुका

शिरूर पंचायत समितीचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण जाहीर

शिरूर प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी गट व गण याची निश्चिती झाली असून मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीसाठी सुद्धा तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहे माहिती शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली आहे 

या संदर्भातील एक प्रारूप प्रभाग रचना परिपत्रक जिल्हाधिकारी जितेंद्र हुडडी यांनी प्रसिद्ध केल असून यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती गण जाहीर करण्यात आलेले आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाले असून जवळपास साडेतीन वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून इच्छुकांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात या निवडणुकी संदर्भात उत्साह आहे व निवडणुका लवकर होतील अशी आशा बाळगून आहेत

तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण खालील प्रमाणे 
 कवठे यमाई जिल्हा परिषद गट 
 तर कवठे यमाई व टाकळी हाजी हे पंचायत समिती गण हे निश्चित करण्यात आले आहे 
 न्हावरा जिल्हा परिषद गट 
 तर शिरूर ग्रामीण व न्हावरा हे पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहे 
 रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट 
 रांजणगाव गणपती व कारेगाव हे पंचायत समिती गन निश्चित करण्यात आली आहे 
 पाबळ जिल्हा परिषद गट 
 तर पाबळ व केंदूर हे पंचायत समिती गण निश्चित करण्यात आली आहे 
 सणसवाडी जिल्हा परिषद गट 
 तर कोरेगाव भीमा व सणसवाडी हे पंचायत समिती गण निश्चित करण्यात आली आहे 
 शिक्रापूर जिल्हा परिषद गट 
 तर शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहे
 मांडवगण जिल्हा परिषद गट 
 तर वडगाव रासाई व मांडवगण फराटा हे पंचायत समिती गणन निश्चित करण्यात आले 

तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणाचा मसुदा तयार करण्यात आले असून  शिरूर पंचायत समितीच्या गट व गणाची संख्या  व व्याप्ती निश्चित करण्यात आली असून या संख्येच्या मसुदा तयार करण्यात आल्या असून
तो दिनांक 14 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असून यावर हरकती घेण्यासाठी दिनांक 21 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात लेखी स्वरूपात आलेल्या सूचना विचारात घेतले जातील असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button