पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

राजगंगा फर्टीलायझर्स ॲड केमिकल्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे शानदार पध्द्तीने उद्घाटन

फर्टिलायझर्स च्या पाच विविध उत्पादनाचे लॉचिंग

 

शिरुर ama9
 अथक परिश्रम आणी बुध्दीमत्ता यांच्या जोरावर शेतकरी  कुटुंबातील असलेले डॉ प्रा . राजेराम घावटे यांनी फिटनेस सेंटर सारख्या  व्यवसायाला   सुरुवात केली .अतिशय प्रतिकुल परिस्थीतीत त्यांनी  हाती घेतलेले काम तडीस नेत शेती टिकवण्यासाठी व्यवसायिक पध्द्तीने शेती ,  ॲग्री बिझनेस व मुल्य साखळीला प्राधान्य दिले . आज जे यश घावटे यांनी मिळवले आहे  ते  कष्ट व जिद्दीने घावटे यांनी मिळविले  असे मत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी व्यक्त केले .
राजगंगा फर्टीलायझर्स ॲड केमिकल्स  प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे
 लिमिटेड यांचा वतीने तयार करण्यात आलेल्या फर्टिलायझर्स च्या पाच विविध उत्पादनाचे लॉचिंग एका शानदार सोहळ्यात पुण्यात करण्यात आले त्या वेळी दिवसे बोलत होते  .
शेतीतून अधिक उत्पन्न वाढीसाठी जिवाणू युक्त सेंद्रिय खतांचा वापर करणे ही येत्या काळाची गरज असून शेतकऱ्यांना शेती टिकवण्यासाठी याचा वापर करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ .सुहास दिवसे यांनी या वेळी सांगितले .
यावेळी जिल्हाधिकारी  डॉ .सुहास दिवसे ,एनआयचे  प्रेसिडेंट राजीव शुक्ला , प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाउ धारीवाल ,सहकार आयुक्त दीपक तावरे  ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , माजी सहकार आयुक्त शेखर गायकवाड , माजी खासदार अमर साबळे ,   विश्वराज महाडिक , तहसिलदार डॉ सुनील शेळके , माजी सनदी आधिकारी भानुदास शेळके , अतिरिक्त आयुक्त यशवंत खैरे  सुशिलकुमार देशमुख , ,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे  , भाजपाचे नेते धर्मेंद्र खांडरे  ,बालरोगतज्ञ विक्रम घावटे ,  व्यवसायिक अभय बरमेचा ,  सुनील घावटे , शिशीर शिंदे , रमेश मोदी ,रमेश चौधरी , ॲड .गौरव  बाफना डॉ . प्रा . पी .एस . वीरकर , आदी यावेळी उपस्थित होते .
प्रकाश धारीवाल म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीत  घावटे यांनी यश मिळविले असुन प्रसाद  घावटे  यांनी स्वकर्तुत्वाने व्यवसायात घेतलेली झेप कौतुकास्पद आहे .
शेखर गायकवाड म्हणाले की
पारंपारिक शेतीला ॲग्री बिझनेस कडे वळविले पाहीजे . शेतीत आमूलाग्र बदल होत असून . शेतीला जोडधंदाची जोड द्यावी असे आवाहन त्यांनी केले .
किशोरराजे निंबाळकर  म्हणाले कंपनीच्या माध्यनातुन  सेंद्रीय  खताची निर्मिती करावे .
सहकार आयुक्त  दिपक तावरे म्हणाले की  जीद्दीने व धाडस करुन प्रा घावटे यांनी कंपनीची सुरुवात केली आहे .
कंपनीचे चेअरमन डॉ . प्रा .राजेराम घावटे आहेत तर सीईओ डायरेक्टर प्रसाद राजेराम घावटे आहेत तर अतिरिक्त संचालक म्हणुन अमृतेश्वरी घावटे काम पहात आहे तर   डायरेक्टर  ऋषीकेश बत्ते, डायरेक्टर तेजस चौधरी ,मार्केटींग डायरेक्टर नानासाहेब शेळके हे आहेत .
प्रास्ताविकात प्रसाद घावटे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात राजगंगा कंपनीचा  व्यवसाय असून त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे . बांधकाम , फिटनेस सेंटर , शिक्षण , पेट्रोल , बायोरेफीनेरी अश्या क्षेत्रात व्यवसाय केला आहे .राजगंगा बायोरेफिनेरीच्या माध्यमातून अल्कोहोल , इथेनॉल , बायो एनर्जी , रसायने , साखर , मोलॉसिस यांचे ट्रेडिंग केले जाते .शेतक-यांना गुणवत्ता पुर्ण उत्पादन देण्याचा प्रयत्न असून डॉ राजेराम घावटे यांनी घालून दिलेली शिस्त व त्याच्या इथिक नुसार कंपनीची वाटचाल सुरु आहे .
यावेळी आभार प्रा डॉ . राजेराम घावटे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button