पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार अशोक पवार यांचे पारडे जड

महायुतीत हि जागा कोणाला जाणार हे ठरेना,राष्ट्रवादी व भाजप मध्ये उमेदवारी वरुन चुरस

शिरुर  ama9

शिरुर लोकसभेच्या निवडणुकी नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उत्साह असुन दोन तीन महिन्यावर आलेल्या विधान सभा निवडणुकीसाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विकास कामांच्या माध्यमातुन मतदार संघ पिंजुन काढला असुन लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना मिळालेले सव्वीस हजार मताधिक्य हि जमेची बाजु  असुन विरोधी पक्षातील इच्छुक सध्या तरी शांत असल्याने अशोक पवार यांचा विकासाचा अश्वमेघ रोखण्यासाठी महायुतीकडील पक्षानकडे कुठलाच अजेंठा नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे .
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कडुन अशोक पवार व भाजप कडुन तत्कालीन आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांच्यात लढत झाली त्यात पाचर्णे यांचा ४१,४०५ मतांनी पराभव झाला त्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले त्या माध्यमातुन अशोक पवार यांनी अनेक विकास कामे मतदार संघात आणली दरम्यान माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने मतदार संघात भाजप मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली पाचर्णे यांच्या सारखे व्यक्तीमत्व असलेला व्यक्ती भाजपमध्ये नसल्याने त्यांच्या निधनानंतर मतदार संघात भाजपला काहीसे पिच्छाडीवर जावे लागले अशोक पवार यांना फक्त बाबुराव पाचर्णे च चांगल्या प्रकारे लढत देउ शकतात हे अनेक वर्ष मतदार संघाने पाहीले आहे .
शिरुर लोकसभेमध्ये  जसे आढळराव यांच्या विरुध्द उमेदवार मिळत नव्हता तशी परिस्थिती आज शिरुर हवेली मतदारसंघातअशोक पवार यांच्या विरोधात उमेदवार निश्चीत होत नाही  .राष्ट्र्वादी फुटी नंतर आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या बरोबर राहील्याने अजीत पवार गटाने आपले पदाधिकारी जाहीर केले .
या निवडणुकीत अनेक विषय पुढे येणार असुन सर्वात  महत्वाचा विषय म्हणजे रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखाना जो चालु वर्षी गळीत न होता बंद झाला असुन कारखान्यावरील कर्जाच्या कारणामुळे कारखाना अडचणीत आल्याची टिका अनेक वेळा विरोधकांनी केली कारखान्याच्या कामगारांनी सुध्दा सहा महिने आंदोलन केले व आमदार अशोक पवार यांच्यावर टिका करत कारखाना अशोक पवार यांच्या नियोजनाअभावी बंद पडला असा आरोप केला मात्र काही महिन्यांनी हा कारखाना अजीत पवार यांच्या मुळे बंद पडला असे कामगारांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्या मुळे जे अशोक पवार यांच्या वर आरोप करत होते ते बुचकळ्यात पडले तसेच राज्य शासनाने अठरा कारखान्यांना कर्ज दिले मात्र ग्घोडगंगेला ला दिले नाही याविरुध्द अशोक पवार यांनी आंदोलन करुन उस सभासदांन पर्यंत हा कारखाना राजकिय स्पर्धेत अडकला असल्याचा  संदेश पोहचविण्यात यशस्वी झाले .
प्रत्यकक्षात  कारखाना बंद झाल्या नंतर कामगारांचे  आंदोलन सुरु झाल्या नंतर त्यात विरोधी असलेल्या भाजप व राष्ट्रवादी या विरोधी पक्षाच्या लोकांनी कारखान्या विरोधात अनेक वेळा आंदोलनाची घोषणा केली मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाही जसा विरोध व्हायला पाहीजे होता तसा तो झाला नाही विरोधी पक्षाच्या कचखाउ धोरणामुळे आंदोलन हवेत विरले महायुतीची सता असताना भाजप राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना एक चांगली संधी कारखान्याच्या रुपाने चालुन आली होती मात्र कारखाना सुरु करण्यासाठी कुणीच प्रामाणीक प्रयत्न केला गेला नाही हि वस्तुस्थिती सभासदांच्या लक्षात आल्याने लोकसभेच्या निवडणुकीत  हा विषय जास्त चर्चेत न येता  लोकांनी या कडे दुर्लक्ष केले आणी हा मुद्दा सुध्दा विधानसभेत जास्त चर्चेत येणार नाही असे राजकिय जाणकरांनचे मते त्या मुळे विरोधकांन सध्या दुसरा मुद्दा पवार यांच्या विरोधात नाही .
महाविकास आघाडीत हि जागा राष्ट्रवादी शरदचंद्र  पवार गटाला गेली आहे त्यामुळे विद्यमान आमदार अशोक पवार यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चीत आहे .मात्र महायुतीत हि जागा कोणाला जाणार याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही .
जवळ जवळ १९९० पासुन शिरुर व हवेली मतदार संघ हा भाजप कडे आहे मात्र २०१९ च्या निवडणुकीत शिरुर हवेली मधुन राष्ट्रवादीचे अशोक पवार निवडुन आले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अशोक पवार हे शरद पवार यांच्याकडे गेले त्यामुळे येथे राष्ट्रवादीचा आमदार असल्याने या जागेवर राष्ट्रवादी आपला हक्क सांगु शकते असे राजकिय जाणकरांचे मत आहे त्याला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दुजोरा दिला आहे .
महायुतीत हि जागा कोणाला जाणार अजुनही स्पष्ट न झाल्याने राष्ट्रवादी व भाजप मधील इच्छुक हे शांत आहेत भाजप मध्ये तशी शांतता आहे निवड्णुकीला तीन महिने वेळ असला तरी महायुतीतील जागा कोणाला जाणार व संभाव्य उमेदवार कोण असणार हे लवकरात लवकर स्पष्ट होणे गरजेचे आहे लोकसभेला जसा उशीर झाल्याने महायुतीच्या उमेदवाराला फटका बसला तसा फटका विधानसभेला सुध्दा बसु शकतो .
महाविकास आघाडीत उत्साह आहे तर महायुतीत उमेदवार कोणाचा व कोण असणार हे न समजल्यामुळे कार्यकर्त्यांना दिशा मिळत नाही .
महा विकास आघाडी कडुन विद्यमान आमदार अशोक पवार हेच उमेदवार असणार हे निश्चीत आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके हे सुध्दा विधानसभेसाठी इच्छुक असुन मात्र हि जागा राष्ट्रवादीला गेल्याने कटके  आगामी काळात काय भुमिका घेतात हे महत्वाचे आहे तर कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट अशोक पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे .
शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद मतदारसंघात वाढली मात्र शिवसेनेची  ताकद काहीशी कमी झाली . राष्ट्र्वादीकडुन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे व तालुका अध्यक्ष रविंद्र काळे  हे इच्छुक असुन जर शिरुर हवेली मतदार संघ राष्ट्रवादी कडे गेला तर हे दोघे प्रमुख दावेदार असु शकतात .
तर भाजप कडे इच्छुकांची गर्दी आहे प्रमुख दावेदार म्हणुन पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप कंद हे असुन तर इच्छुक  जिल्हा नियोजन  समिती सदस्य राहुल पाचर्णे ,पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे ,उद्योग आघाडीचे जिल्हा ध्यक्ष संजय पाचंगे ,माजी तालुका अध्यक्ष भगवान शेळके ,तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांची नावे चर्चेत असुन हा मतदार संघ तीस वर्षापासुन भाजप कडे मात्र राजकिय समिकरण बदलल्याने महायुती मध्ये हा मतदार संघ कोणाकडे जातो हे पाहणे महत्वाचे आहे .
अवघ्या काही महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सध्या तरी विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या समोर तगडा उमेदवार दिसत नसुन उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यास अनेक गोष्टी घडु शकतात मात्र निवडणुकीत विरोधकांना आपलेसे करणार माजी आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांची उणीव भाजपला  या निवडणुकीत  निश्चीत भासणार हे मात्र तेवढेच खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button