गुन्हेगारीपुणे जिल्हाशिरूर तालुका
अबब …शिरुर शहरात भर दिवसा एवढ्या तोळ्याची झाली चोरी
भरदिवसा चोरी झाल्याने नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण

शिरुर ama9
शिरुर शहरातील पोलीस स्टेशनच्या मागे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्टेट बॅंक कॉलनी मध्ये भरदिवसा दुपारी साडे बारा वाजता घराचे सेप्टी दरवाजा कटरने कट करुन चक्क साडे बारा तोळे सोने लंपास केले तर त्याच बिल्डिंग मध्ये दुसरे घर फोडुन एक तोळे सोने नेल्याची माहीती स्थानीक नागरीकांनी दिली .
M
या बाबत स्थानीक नागरीकांनी दिलेली माहीती पुढील प्रमाणे स्टेट बॅंक कॉलनी परिसरात एका अपार्ट्मेंट मध्ये पंधरा दिवसापुर्वीच एका कंपनीत काम करणारी महिला या ठिकाणी राहवयास आली दिनांक १० रोजी नेहमी प्रमाणे ती महिला कंपनीत कामास गेली होती बिल्डिंग मध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन घरे फोडली .नंतर या महिल्याच्या शेजारी आल्या नंतर त्यांना दरवाजा तोडलेला दिसला व त्यांनी संबधीत महिलेला कळविले महिला कंपनीतुन आल्या नंतर तीला चोरी झाल्याचे लक्षात आले घरातील साडे बारा तोळे सोने गेल्याचे लक्षात आले ती महीला घरात एकटीच राहत होती आजुबाजुला लोकवस्ती असलेला परिसर असुन ही दिवसा चोरी होते त्या मुळे नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे चोरटे हे दुचाकी वरुन आले असल्याचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसत आहे .या चोरी नंतर महीला भेदरलेल्या अवस्थेत दिसत होती घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे .


