पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
सरदवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मीबाई जाधव यांचा वाढदिवस साजरा
वाढदिवसानिमित्त मुकबधिर विद्यार्थ्यांना खाउ वाटप

शिरुर ama9
सरदवाडी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत सदस्य शिल्पा घावटे यांचा वाढदिवस निवासी मूकबधिर विद्यालय सरदवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वेलवेट पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे माजी पोलीस निरीक्षक इंद्रभान सरोदे, विजय उद्योग समूहाचे बंटी शेठ कुंडलिक ,साई उद्योग समूहाचे दत्तात्रय सरोदे, सुनील कर्डिले , ह भ प गंगाधर कर्डिले, सुयोग घावटे,नाथा शेळके, ग्रामपंचायत सदस्य विद्या सरोदे, मोनाली कर्डिले, कृष्णा घावटे ,उमेश सरोदे,भगवान जाधव,मनोहर सरोदे, ओंकार सरोदे, यश गुंदेचा, प्रतिक निरवणे, सुजाता सरोदे, व ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते.


