पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने दोन हजार वृक्ष लागवड
आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन सुरवात
शिरुर ama9
शिरुर ग्रामीण परिसरात दोन हजार वृक्षांची लागवड होत आहे निश्चीतच कौतुकास्पद असुन दोन हजार पेक्षा वृक्ष लागल्यास आपला ग्रामीण परिसर हिरवागार दिसेल या साठी शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले .
सध्या वाढत असलेल्या तापमानाचा धसका सर्वांनी घेतला असुन त्या दृष्टीने एक अनोखा उपक्रम शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत (रामलिंग )यांनी राबविला असुन ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बाबाजी वर्पे यांच्या पुढाकाराने दोन हजार वृक्ष शिरुर ग्रामीण ग्रामपंचयातीच्या हद्दी मध्ये या वृक्ष लावण्यात येणार आहे त्या वृक्षांची लागवडीची (वृक्षारोपणाच्या) सुरवात आमदार ॲड .अशोक पवार यांच्या हस्ते बोऱ्हाडे मळा येथे करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते .
या वेळी गटविकासअधिकारी महेश डोके ,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे ,सरपंच शिल्पा गायकवाड ,उपसरपंच बाबाजी वर्पे ,सदस्या मोनीका जाधव ,लीलाबाई दौंडकर ,नंदा दसगुडे ,लता इसवे ,सदस्य सचिन घावटे , रामलिंग देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे ,संचालक नामदेव घावटे ,माजी सरपंच अरुण घावटे ,विट्ठल घावटे ,नामदेव जाधव, माजी उपसरपंच भरत बोऱ्हाडे ,नितीन बोऱ्हाडे ,संजय शिंदे राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष अमोल वर्पे , तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे शंकर गायकवाड , ग्रामसेवक पोपट केदारी ,ग्रामपंचायतीचे हेड क्लार्क शिवाजी महाजन आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते .आमदार अशोक पवार म्हणाले कि या उपक्रमासाठी जे वृक्ष आणले असुन ते आठ फुट पेक्षा जास्त उंचीचे असल्याने वृक्षाचे जगण्याचे प्रमाण खुप जास्त राहणार आहे . तसेच वृक्षांसाठी ठिबक पध्दत असल्याने हा परिसर अतिशय सुंदर होणार असल्याचे पवार या वेळी म्हणाले या पुढे जंगलात गावे दिसली पाहीजे इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन जगविली पाहीजे या काही महिन्यात तालुक्यात सर्वाधीक उष्णतेचे प्रमाण होते त्या मुळे झाडांचे महत्व नागरीकांना पटले आहे .स्वागत सरपंच शिल्पा गायकवाड यांनी केले ,सुत्रसंचालन अरुण घावटे यांनी केले तर आभार बाबाजी वर्पे यांनी मानले .


