पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी – मनसेची मागणी
*शिरुर नगरपरिषदेच्या गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मनसेने दिले निवेदन...

शिरुर ama9
शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करावी अशी मनसेची मागणी मनसेच्या वतिने गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली . या निवेद्नावर मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांच्या सह्या आहेत .
मुंबई मंत्रालयात येथे सावे यांना निवेदन देण्यात आले या वेळी
मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे उपस्थित होते .
या निवेदनात म्हटले आहे कि
शिरुर नगरपरिषदेची १५० वर्षांच्या इतिहासामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची घरकुल योजना नगरपरिषदेने राबविलेली नाही. गेली अनेक वर्षे परंपरागतरित्या सफाई कर्मचारी शिरुर शहराची स्वच्छता करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी त्याच कुटुंबातील किंवा जवळच्या नातलगांमधून सेवेत समाविष्ट केले जातात. परंतू हे कर्मचारी / कामगार आजही शहरातील झोपडपट्यांमध्ये राहत असून त्यांची दयनीय अवस्था आहे. शहराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सदर कामगार रात्रंदिवस काम करत असतात. परंतू त्यांचे जीवन हालाखीचे बनले आहे.ते राहत असलेल्या झोपडपट्टी मध्ये प्राथमीक सुविधा नाहीत . शहरातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी लागणारी शासनाची जागाशहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिरुर शहरामधील हुडको कॉलनी जवळील दत्त मंदिराजवळील मोठा भूखंड तसेच पाबळ फाटा येथील अशा अनेक जागा उपलब्ध आहेत. तरी इतिहासकालीन नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना शिरुर शहरामध्ये घरकुल बांधून मिळण्यासाठी शासन स्तरावर आपले माध्यमातून प्रयत्न व्हावेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय मिळेला पाहिजे अशी मागणी करण्यात आली
याची तात्काळ दखल घेत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सावे यांनी मनसेचे पत्र जोडून मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याबाबत विनंती केली . मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांच्या निवेदनानुसार पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याकरिता आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे विनंती पत्र गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले


