पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांची मागणी

शिरूर ama9 

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पाऊस,गारपीट व वादळात झालेल्या नुकसानिमुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून काही शेतकऱ्यांची  घरे पडली आहे. या शेतकरयांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे  जिल्हा प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य  ज्ञानेश्वर(माऊली) कटके यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांत कटके यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,शिरूर तालुक्यात पूर्व भागात अवकाळी पाऊस,गारपीट व वादळाने कहर केला असून गारपीट व वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.काहींचे घरावरील पत्रे उडाले आहेत.पोलीहाऊस, पोल्ट्री शेड,गुरांचे गोठे यावरील पत्रे उडाले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.अनेक गावात शासकीय पातळीवर पंचनामा करण्यात येत असून त्यात सविस्तर पंचनामा करण्यात यावा.तसेच नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी.या साठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर-हवेलीत वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारपिटीने पिकांसह भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित सर्व पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी,” अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी सध्या झालेल्या वळिवाचा पाऊस व गारांमुळे हातचे पीक गेल्याने आणखी संकटात सापडला आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तसेच नुकसान भरपाई त्वरित देण्याची कार्यवाही तातडीने करावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी  ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले
 यात पुर्वहवेलीतील वळती, तरडे, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी तसेच शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी, मांडवगण फराटा, इनामगाव, कुरुळी, आंधळगाव, वडगाव रासाई आदी गावांमध्ये वादळ, वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस, केळी, डाळिंब, चारा पिके यांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले
आहे. त्याचबरोबर वादळ वाऱ्याने गुरांचे गोठे, पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्म, नर्सऱ्या यासह घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथाही कटके यांनी जाणून घेत याबाबत सविस्तर माहिती व नुकसान भरपाईबाबत कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे.
माउली कटके यांनी नुकसानग्रस्त दहा कुटुंबांना वैयक्तीक आर्थीक मदत या वेळी केली .
यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक वीरेंद्र शेलार,सरपंच दिपाली नागवडे,पंडित जगताप,अविनाश पवार,अशोक जगताप, बाबा घाडगे,कैलास फराटे, ऋषी निंबाळकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button