पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरुर मध्ये मंत्री आदिती तटकरे यांची शिरुर शहरात भव्य पदयात्रा
पदयात्रेला चांगला प्रतिसाद

शिरुर ama9
शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचाराकरीता महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे
यांनी रॅली द्वारे शिरुर शहरातुन पदयात्रा करत येथे मतदारांशी संपर्क साधला .

शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग येथील प्रभु श्री रामलिंग महाराज यांचे दर्शन घेउन शिरुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यावर रॅलीस सुरुवात झाली .
रॅलीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक चे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण , माजी आमदार रमेश थोरात , राष्ट्रवादीजिल्हाध्यक्ष क्रिडा विभाग स्वप्न्नील ढमढेरे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका रविंद्र काळे ,महीला अध्यक्षा आरती भुजबळ , शहराध्यक्ष शरद कालेवार ,भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे , शिवसेनेचे शहराध्यक्ष मयूर थोरात ,आरपीआय(आठवले ) शहराध्यक्ष नीलेश जाधव , शृतिका झांबरे , संतोष शितोळे , एजाज बागवान ,वर्षा काळे ,विजय नर्के ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , अविनाश जाधव, रंजन झांबरे ,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मितेश गादीया ,माजी नगरसेविका अंजली थोरात ,मनिषा थोरात आदी उपस्थित होते ..

शिवाजीराव आढळराव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन तटकरे यांनी या वेळी केले . या पदयात्रेला शहरातुन चांगला प्रतिसाद मिळाला .
तसेचमहायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई माधुरी अक्षय आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा गुरूवार दिनांक ९ मे रोजी दौरा आयोजित करण्यात आला होता या वेळी त्यांनी कुंभार आळी ,सोनार आळी, मुंबई बाजार तसेच शहराच्या अनेक भागातुन पदयात्रा काढुन नागरिकांशी संवाद साधला व आढळराव यांना विजयी करण्याचे आवाहन केले .सर्व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या वेळी माधुरी आढळराव पाटील म्हणाल्या कि पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता शिवाजीदादा शंभर टक्के विजयी होउन चौकार मारणार असा विश्वास या वेळी माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला .


