पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
देशाला सुरक्षीत व विकासाच्या दृष्टीने मजबुत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारास निवडुन द्यावे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरुर येथील जाहीर सभेत आवाहन

शिरुर ama9
हि निवडणुक नेहमी सारखी नसुन स्थानिक स्वराज्य संस्थेची हि निवडणुक नसुन देशाचा नेता निवडण्याची ,देश कोणाच्या हातात द्यायचा याचा फैसला करणारी व देशाचा विकास कोण करु शकतो,देशाची सुरक्षा कोण मजबुत करु शकतो जनतेच्या अपेक्षा कोण पुर्ण करु शकतो याचा फैसला करणारी हि निवडणुक असुन गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम पाहता या वेळेस महायुतीच्या उमेदवारास निवडुन द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर शहरातील पाच कंदील चौकात जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती त्या वेळेस ते बोलत होते या वेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील , आमदार महेश लांडगे ,राहुल कुल ,निरंजन डावखरे ,माजी आमदार योगेश टिळेकर ,पोपटराव गावडे ,उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील ,प्रदेश जनता दल अध्यक्ष नाथाभाउ शेवाळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके , जिल्हा भाजप सचिव धर्मेंद्र खांडरे ,पुणे जिल्हा वॅंकेचे संचालक प्रदीप कंद ,बाजार समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल ,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे ,भाजपच्या ज्येष्ट नेत्या जयश्री पलांडे ,माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे ,घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे ,माजी संचालक सुधीर फराटे ,भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे ,शहरअध्यक्ष नितीन पाचर्णे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रविंद्र काळे ,शहरअध्यक्ष शरद कालेवार ,शिवसेना तालुका प्रमुख रामभाउ सासवडे ,शहरप्रमुख मयुर थोरात ,यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष जगताप ,युवा नेते राजेंद्र जासुद आदी सह हजारो नागरीक सभास्थळी हजर होते . या सभेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला भर उन्हात सभा असताना नागरिकांनी सभेला प्रचंड गर्दी केली होती .

फडणवीस म्हणाले कि निवडणुक आढळराव पाटील व विद्यमान खासदार यांच्यात नसुन दोन गटान मध्ये हि निवडणुक आहे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात हि निवडणुक असुन आपली महायुती हि मजबुत असुन महाविकास आघाडी मध्ये चोवीस पक्षांची खिचडी आहे हि निवडणुक पुढच्या पिढीची कल्याण करणारी हि निवडणुक असल्याचे फडणवीस म्हणाले .

या वेळी महायुतीचे उमेदवार आढळराव म्हणाले कि हि निवडणुक हि प्रतिष्ठेची आहे देशाचा पंतप्रधान ठरवणारी हि निवडणुक असुन गेल्या दहा वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम राममंदीर उभारण्याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदींना जात असुन देश कोणाच्या हातात द्यायचा हे या निवडणुकीत ठरणार असुन जगाच्या पाठीवर बलशाली देश म्हणुन भारत देशाला ओळखले जाते ते फक्त नरेंद्र मोदींन मुळे त्यामुळे नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला साथ द्या या निवडणुकीत राहुल गांधीच्या नावाचा कोणी सुध्दा विचार करणार नाही कोरोना काळात मि स्वता संपुर्ण मतदार संघात कुठलीही पर्वा न करता औषधे व किराणा याचे वाटप केले मात्र विद्यमान खासदार शुटिंग मध्ये व्यस्त होते असा आरोप ही आढळराव यांनी केला .
या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील , प्रदीप कंद ,मंगलदास बांदल ,राहुल पाचर्णे यांनी आपली मनोगत व्यक्त केली .सुत्रसंचालन व आभार धर्मेंद्र खांडरे यांनी केले .
चौकटशिरुर हवेलीचे माजी आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांचे दिड वर्षापुर्वी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे स्मारक त्यांचे गाव असलेले तर्डोबाचीवाडी येथे शक्तीस्थळ म्हणुन उभारले आहे त्या शक्तीस्थळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देउन त्यांच्यास्मारकाचे दर्शन घेउन पुष्पहार अर्पण केला व आठवणींना उजाळा दिला पाचर्णे हे फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जात होते या वेळी पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे ,मुलगा राहुल पाचर्णे ,पुतणे नितीन पाचर्णे ,सरपंच जगदीश पाचर्णे सह ग्रामस्थ उपस्थित होते .चौकटजय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्या नंतर राज्यभर उमेदवारानसाठी मेळावे घेत आहे रामोशी ,बेडर समाजाचे ते नेतृत्व करत आहे त्यांच्या कामाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शितोळे यांचा आमचे मित्र म्हणुन उल्लेख केल्या नंतर सभेठिकाणी टाळ्यांचा गजर झाला .


