पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

पद्मश्री मणिभाई देसाई पुरस्कार माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांना प्रदान

राष्टसेवा पुरस्कार देउन त्यांचा गौरव

शिरुर पुढारी 

शिरुर ग्रामीण चे माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब ईश्वर सरोदे यांना या वर्षीचा  पद्मश्री डॉ मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार व निती आयोग भारत सरकार संयुक्त  विद्यमाने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला .
हा पुरस्कार  आबासाहेब सरोदे  यांना दिनांक शनिवार २७ रोजी  रोजी डॉ रवींद्र भोळे यांचा हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे येथे देण्यात आला .
आबासाहेब सरोदे गेल्या काही वर्षापासुन शिरुर पंचक्रोशी (शिरुर ग्रामीण ) रामलींग ,सरदवाडी ,अण्णापुर ,कर्डेलवाडी ,तर्डोबाचीवाडी या भागात चांगले सामाजीक काम असुन याला समर्थन देत २०१७ या वर्षी ते शिरुर ग्रामीण मधुन पंचायत समिती सदस्य म्हणुन निवडुन आलेतसेच २००३ ते २००८ पर्यंत सरदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य व २०१३ ते २०१७ पर्यंत उपसरपंच पद भुषविले . त्यांनी गेल्या पाच वर्षातील केलेल्या कामाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार सरोदे यांना देण्यात आला .
पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग भारत सरकार सलग्नित, मिनिस्ट्री एम एस एम इ भारत सरकार सलग्न संस्थेच्या वतीने, व राष्ट्र सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई जयंती निमित्ताने डॉ.मणी देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल शासनाकडून घेतलीच जाते ,असे नाही.  निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे अत्यंत गरजेचे आहे. पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई यांच्या स्मृती जागवून व ब्रह्म सत्य जगत स्फूर्ती म्ह´णून पद्मश्री डॉ. मणी देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार राज्य व राष्ट्रीय पातळीवरदिले जातात.
 पुरस्काराचे हे हे तिसावे वर्ष आहे.  यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रयागधाम ट्रस्टचे अमर नित्यानंद जी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की असे कार्यक्रम कार्यकर्त्यांना स्फूर्ती देतात व यातूनच सदृढ हिंदुराष्ट्र निर्माण होईल.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे यांच्या शुभहस्ते यावर्षीचे पद्मश्री डॉ मणीभाई देसाई  पुरस्कारा प्रदान करण्यात आले.  प्रमाणे पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार राष्ट्र सेवा समिती, महाराष्ट्र राज्य वतीने जाहीर करण्यात आलेले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button