पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरुर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची भव्य मिरवणुक
विजयाचा निर्धार करत शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी
शिरुर ama9
शिरुर शहरातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांनच्या कार्यकर्त्यांनी वारा पावसाची तमा न बाळगता जि भव्य जंगी मिरवणुक शिरुर शहरातुन काढली ते मि उद्याच्या विजयाचे प्रतिक समजतो असे मत महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले .

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्त शिरुर शहरातुन दिनांक २४ रोजी सायंकाळी भव्य अशी मिरवणुक काढत आढळराव यांनी मतदारांशी संवाद साधला छ्त्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन मिरवणुकीस सुरवात झाली सुसाट वारा ,पाउस अशा वातावरणात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत पुना नगर रोड ,मारुती आळी ,सरदार पेठ ,सोनार आळी ,सुभाष चौक ,डंबेनाला ,कापडबाजार अशा मार्गाने हि मिरवणुक काढण्यात आली .
ठिकठिकाणी आढळराव यांचे नागरिकांनी स्वागत केले .

या वेळी भाजप ज्येष्ट नेत्या जयश्री पलांडे ,पुणे मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप कंद ,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे ,भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड धर्मेंद्र खांडरे ,घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रविंद्र काळे ,शहरअध्यक्ष शरद कालेवार ,भाजप तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे ,शहरअध्यक्ष नितीन पाचर्णे ,शिवसेना तालुकाअध्यक्ष रामभाउ सासवडे ,शहर प्रमुख मयुर थोरात ,रंजन झांबरे ,एजाज बागवान ,श्रुतीका झांबरे ,सुरेश गाडेकर ,निलेश नवले ,अमोल वर्पे ,अभिजीत पाचर्णे, मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबुब सय्यद ,तालुका संघटक अविनाश घोगरे ,शहर अध्यक्ष आदित्य मैड आदी सह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .
या वेळी आढळराव म्हणाले कि मि अनेक निवडणुका लढलो पण आजच्या मिरवणुकीतील उत्साह पाहता शिरुर शहर ,पंचक्रोशी ,ग्रामीण भागातुन ८० टक्क्या पेक्षा जास्त मतदान होईल मला होईल अशी मला खात्री आहे .देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विराजमान होणार आहे त्या मुळे त्यांच्या विचारांचा खासदार संसदेत जाणे गरजेचे असुन आपण गेल्या वेळेस जि चुक केली चुकीचा माणुस निवडुन दिला विरोधी पक्षाचा माणुस दिल्यामुळे मतदार संघाचे नुकसान होउन मतदार संघ पाच वर्ष मागे गेला एक रुपयाचा निधी या मतदार संघात आणला नसल्याचा आरोप या वेळी आढळराव यांनी केला .एक रुपयाचा निधी न आणल्यामुळे या वेळेस आढळराव यांना निवडुन आणण्याचा निर्धार शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी केला असल्याचे आढळराव या वेळी म्हणाले .


