शिरूर तालुका
…….अन्यथा महावितरण कंपनीला प्रतिकात्मक कंदिल देणार – तेजस यादव
शिरूर ama9news वृत्तसेवा महावितरणाने शेतकऱ्यांवरील व सर्वसामान्य ग्राहकांवरील जुलमी महावसुली सावकारकी बंद करावी अन्यथा याचा निषेध म्हणून महावितरणास कंदील भेट देण्यात येईल असा इशारा शिरूर हवेलीचे मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
राज्याच्ये उर्जामंत्री यांच्या नावाने हे निवेदन शिरूर येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंते सोमनाथ माने यांना देण्यात आले . या वेळी जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे , शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे , रयत शेतकरी संघटनेचे भरत काळे , महिला आघाडीच्या डॉ वैशाली साखरे , उपतालुकाअध्यक्ष रविंद्र गुळादे ,शाखा प्रमुख शिक्रापुर प्रेम नायकोडी , नितीन वायकर आदी उपस्थित होते .
या निवेदनात असे म्हटले आहे कि
कोरोना महामारीत संपूर्ण देश लॉकडाऊन होता त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे हेळसांड झाली असताना अतोनात नुकसान झाले असून आपल्या महावितरणाकडून जो जुलूम, महावसुली सावकारकी केली जाते ती थांबवावी तसेच महावितरण शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांची लूट व जुलूम महावसुली व सावकारकी कशी केली जाते ते खालीलप्रमाणे
शेतकऱ्यांचे कोटेशन ३ एच.पी असताना अचानक ५ एच.पी. बिलावर देऊन वाढीव बिल
देण्यात येते ही महावसुली सावकारकी नाही का? , लाईट बिलावर ३ वर्षापुर्वी फोटो येत होता, अलिकडच्या काळात बिलावर मीटरचा फोटा का येत नाही, ही महावसुली सावकारकी नाही का?, बिलाचे वाटप न झाल्याने बिलांच्या रक्कमा थकबाकीत जाऊन त्याला व्याज लावून हा त्रास शेतकऱ्यांना व सर्वसामान्य ग्राहकाला का? ही महावसुली सावकारकी नाही का, रिडींग पध्दतीमध्ये शाश्वती नसल्याने कधी ग्राहकाला कमी युनिटचे बिल दिले जाते परंतु पुढच्या वेळी ग्राहकाच्या त्या मीटरचे रिडींग घेतले असता युनिटमध्ये १०० युनिटपेक्षा जास्त हु असल्याने दुप्पट दराने वीज बिल आकारुन त्याला व्याज लावून आकारले जाते, ही, सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट घेऊन कनेक्शनसाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष ग्राहकालाच आणावे लागते आणि सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट आकारुन ग्राहकाच्या बिलावर नोंद नाही हा सरळसरळ घोटाळा असून ही महावसुली सावकारकी नाही का?सर्वात महत्त्वाचा मुद्दा वीज कनेक्शन तोडण्यासाठी १५ दिवसाआधी नोटीस देणे गरजेचे असताना अचानक गावच्या गावे व त्या गावांमधील रोहित्रे पुर्णपणे बंद करून वीज खंडीत केली जाते हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य जय जवान…. जय किसान… या वाक्याला छेद देण्याचे काम करुन महावितरण महावसुली सावकार आहेत, हे स्पष्ट होत आहे. यापुढे अशाप्रकारचे वीज खंडीत करु नये व गावच्या गावे अंधारात ठेवू नये असे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ दिवसानंतर आपणास कंदीलाची प्रतिकृती भेट देण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे .
चौकट अविनाश घोगरे शहरअध्यक्ष मनसे
महावितरण कंपनीने जी शेतकरी व नागरिकांन विरूध्द सावकारी वसुली चालु केली असुन व तोडलेले विज कनेक्शन त्वरित जोडुन द्यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा घोगरे यांनी दिला .
सुशांत कुटे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष
महावितरण कंपनीकडुन जी ग्राहकांची लुट चालली आहे ती ताबडतोब थांबवावी व हाता तोंडाशी आलेले पिक केवळ विज नसल्यामुळे जाऊ नये आधीच अवकाळी पावसाने तसेच अती वृष्टीमुळे शेतकऱ्यांनची पिके वाया गेली आहे त्यामुळे विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना जास्त त्रास देउ नये .
फोटो ओळी शिरूर येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंते सोमनाथ माने यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी



