शिरूर तालुका
हुडको मार्गावरील रस्ता त्वरित नवीन करावा – शैलेश जाधव
शिरूर ama9 वृत्तसेवा
चां.ता.बोरा काॅलेज रोड व हुडको काॅलनी रोड नविन मार्केट यार्ड रोड नविन नगरपालीकेकडे जाणारा रोडची अवस्था अत्यंत बीकट झाली असुन रस्त्याची दुरआवस्था पाहता वृद्ध,वयस्कर, लहान मुलांना,आजारी व्यक्तीना याचा प्रचंड त्रास होऊ शकतो त्या मुळे रस्ता या ठिकाणी ताबडतोब दुरुस्त करुन नवीन रस्ता करण्यात यावा अशी मागणी हुडको कृती समितीचे शैलेश जाधव यांनी केली आहे .
या बाबत बोलताना शैलेश जाधव यांनी सांगितले कि हा रोड नगर-पुणे महामार्गाला जोडणारा रस्ता असुन बाबुरावनगरमधील हाॅस्पिटलकडे जाणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रुग्णवाहीका आणि गाड्यांची वरदळ असते. आठवडा बाजारसाठी याच रस्त्याचा वापर शेतकरी आणि आजुबाजुच्या गावातील लोक करत असतात या हुडको काॅलनीचा रस्त्यावर इतके खड्डे आहेत की गाडी चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याने गाडी चालविताना भटके कुञे गाड्यांच्या मागे लागतात,अनेकवेळा या कारणास्तव छोटे मोठे अपघात देखिल झाले आहे,तरी देखिल शिरूर नगरपरिषद प्रशासन याबाबत काही दखल का घेत नाही असा आरोप करत लवकरात लवकर या रस्त्याचे काम न झाल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे शैलेश जाधव यांनी सांगितले .
फोटो हुडको रस्त्यावरील पडलेले खड्डे



