शिरूर तालुका

प्रत्येक व्यक्तीने ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे – मानसिंग पाचुंदकर

शिरूर ama9  वृत्तसेवा 

प्रत्येक व्यक्तीने एखादे ध्येय मनाशी बाळगुन ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर त्याला यश निश्चित मिळते असे मत  आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी व्यक्त केले . 
 दिनांक ५ डिसेंबर रोजी भांबर्डे येथील अप्पा पवार यांनी अवघ्या २७ मिनीटामध्ये राज्यातील सर्वात उंच (१६४६मीटर) असलेल कळसुबाई  जि.नगर येथील शिखर सर केल्या बद्दल व विश्वविक्रमात नोंद व एव्हरेस्ट सर करण्याचा  मानस असल्याबद्दल आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्या वेळी ते बोलत होते.  यावेळी गणेगावचे ग्रामपंचायत सदस्य सुहास बागर,रांजणगाव गणपती सोसायटीचे मा.चेअरमन आत्माराम खेडकर , पोलीस उपनिरिक्षक सुनिल राजाराम लोखडे,युवा उद्योजक संपत शेळके, निलेश खेडकर,सुदाम खेडकर आदिसह नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळी भांबर्डे येथील अप्पा पवार यांनी अवघ्या २७ मिनीटामध्ये  कळसुबाई   शिखर सर केल्या बद्दल  आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सन्मान केला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button