शिरूर तालुका
शिरूर मध्ये दिनांक ७/१२ दिवशी मोफत सातबारा वाटप
शिरूर ama9 वृत्तसेवा डिजिटल सातबारा मिळू लागल्याने शेतकऱ्यांचे वेळ व त्रास थांबण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन कामगार तलाठी सर्फराज देशमुख देशमुख यांनी केले.
शिरूर येथे महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत सातबारा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,पूर्वी सातबारा मिळवणे यासाठी शेतकऱ्यांना तासनतास उभे राहावे लागत होते.त्यात अनेकदा धावपळ व मोठा मानसिक त्रास होत होता.ही बाब लक्षात घेता महसूल प्रशासनाने डिजिटल सातबारा मोहीम हाती घेतली.यामुळे कामात मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता येत असून शेतकऱ्यांना ही सातबारा मिळण्यासाठी सुलभता मिळत आहे यामुळे मोठा बदल जाणवत असून भविष्यात ग्रामीण भाग हा पूर्ण डिजिटल झालेला चित्र पहावयास मिळणार आहे.
यावेळी १६० सातबारा उतारे नागरिकांना देण्यात आले.या प्रसंगी आदेश बारगळ, अक्रम चाऊस आदी सह नागरिक उपस्थित होते.



