KOREGAON BHIMA

माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव भीमा येथे प्रा. चंद्रकांत गव्हाणे यांच्या पुढाकाराने कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कोरेगाव भीमा ama9 वृत्तसेवा 
               देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव भीमा येथे प्रा. चंद्रकांत गव्हाणे यांच्या पुढाकाराने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
               शेतकरी वाचला तर देश वाचेल या विचारांच्या अंतर्गत भारतीय जैन संघटनेचे प्राध्यापक संशोधक चंद्रकांत गव्हाणे यांनी रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी करावी यासाठी विविध प्रकल्पांचे संशोधन केलेले आहे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करून  त्या ठिकाणी माहिती देण्यासाठी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोरेगाव भीमा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. गव्हाणे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना समजून सांगितले. त्याचप्रमाणे सी. बी. जी. प्रकल्प गांडूळ निर्मिती गांडूळ खत तसेच कीटकनाशक निर्मिती या फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रकल्प प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दाखविण्यात आले. सहा महिन्यात शेतकरी लखपती योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतामध्ये विविध तरकारी पिके निरोगी व वाढ याची माहिती उपस्थितांना दिली. त्याच प्रमाणे सेंद्रिय शेती मुळे होणारे फायदे रासायनिक शेती मुळे होणारे तोटे याचे प्रात्यक्षिक संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना व उपस्थितांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button