शिरूर तालुका

शिरुर शहराच्या चेहरामोहरा विकासकामाच्या माध्यमातून बदलणार – सभागृह नेते प्रकाश धारीवाल

शिरूर ama9  वृत्तसेवा शिरुर शहरात विविध विकासकामे सुरु असून शिरुर शहराच्या चेहरामोहरा या विकासकामाच्या माध्यमातून बदलणार आहे .शिरुर नगरपरिषदची नवीन इमारत शहराच्या वैभवात भर घालणा- या आहेत. नागरिकांनच्या दळणवळणासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे असुन त्यासाठी शहरात अनेक भागातील चांगल्या प्रतिच्या रस्त्याची कामे सुरु असल्याचे मत पालिकेचे सभागृह नेते व उपनराध्यक्ष  प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले 

शिरूर शहरातील  वर्दळीचा असणा-या बी जे कॉर्नर ते बोरा कॉलेज  रस्त्त्यांच्या  एकात्तर लाख रुपयांच्या  कामाचे भूमिपूजन धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले . त्या वेळी ते बोलत होते .  
यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर ,बांधकाम समिती सभापती अभिजीत पाचर्णे ,स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,पाणी पुरवठा समिती सभापती मुज्जफर कुरेशी ,महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ज्योती लोखंडे,नगरसेविका सुरेखा शितोळे,संगिता मल्लाव, सुनीता कुरुंदळे ,मनीषा कालेवार ,नगरसेवक संजय देशमुख,शिरूर नगरपरिषदेचे  सभा अधीक्षक अयुब सय्यद, स्वच्छता विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बर्गे ,प्रशांत थोरात,तुषार अडसुळ,राष्ट्रवादीचे सागर नरवडे,सागर पांढरकामे ,तुकाराम खोले  सह स्थानिक नागरिक उपस्थित होते . 
हे काम अठरा टक्के बिलोने दिले असुन त्यामुळे नगरपरिषदेचा फायदा होणार आहे असेही धारीवाल यावेळी म्हणाले . 
स्वच्छता अभियान शिरुर शहराच्या स्वच्छता अभियानात बक्षिस मिळाले असून यात नागरिकांचे मोठे योगदान व सहकार्य असून स्वच्छ व सुंदर शिरुर साठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे शिरुर नगरपरिषदेचे सभागृह नेते व उपनगराध्यक्ष प्रकाश धारिवाल म्हणाले .
बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे म्हणाले शिरुर शहरात सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे जोमाने सुरु आहेत शहर व उपनगरातील विविध रस्त्याची कामे सुरु आहेत शहराच्या विविध भागातील कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे सुरु असुन  आम्ही विकासासाठी कटिबध्द असल्याचे पाचर्णे यांनी यावेळी सांगितले .  
फोटो ओळी   बी जे कॉर्नर ते बोरा कॉलेज  रस्त्त्यांच्या    कामाचे भूमिपूजन  प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले . त्या वेळी उपस्थित नगरसेवक 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button