शिरूर तालुका
रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष ,माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) च्या पुणे ते रांजणगाव गणपती (MIDC) या बस फेरीचा प्रथम वर्धापन दिनानिमीत्त बसचे चालक व वाहक यांचा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
शिरूर ama9 वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष,देशाचे नेते,मा.केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राजमुद्रा चौक,रांजणगाव गणपती ता.शिरूर येथे
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) च्या पुणे ते रांजणगाव गणपती (MIDC) या बस फेरीचा प्रथम वर्धापन दिनानिमीत्त बसचे चालक व वाहक यांचा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितेचे माजी सभापती विश्वास कोहकड़े,कारेगावचे मा उपसरपंच राजेंद्र नवले पाटील रांजणगाव गणपतीचे मा.सरपंच भास्कर लांडे,सोसायटीचे मा.चेअरमन आत्माराम खेडकर,सोने सागवी गावचे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र काळे,सोने सागवी शालेय शिक्षण समितेचे अध्यक्ष संतोष (हरी) दाते,युवा उद्योजक अनिल दूंडे,राजमुद्रा ग्रुप ऑफ कंपनीजचे डायरेक्टर युवा उद्योजक ज्ञानेश्वर (माऊलीशेठ) पाचुंदकर पाटील,सचिन दुंडे,आचल फलके,निलेश नवले,विलास फंड,दिपक फलके,सुभाष नवले ,सत्यवान शेळके, मयूर पाटील, विजय खेडकर,निलेश लाडे,अमोल सरड,आदी उपस्थित होते.
बसमधील प्रवाशांना व उपस्थित नागरिकांना पेढे वाटुन देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) च्या पुणे ते रांजणगाव गणपती (MIDC) या बस फेरीचा प्रथम वर्धापन दिनानिमीत्त बसचे चालक व वाहक यांचा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला



