शिरूर तालुका
शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यास आलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेरून आणावी लागते सिरीन ( इंजेक्शन)..!
शिरूर ama9 वृत्तसेवा शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यास आलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी सिरीन (इंजेक्शन) बाहेरून आणावी लागत असल्याने याचा निषेध म्हणुन नियमबाह्य गलथान कारभाराला आळा बसावा,नागरिकांची आर्थिक-मानसिक लूट थांबावी व सिरीन (इंजेक्शन) हे रुग्णालयामध्ये मोफतच मिळावे, यासाठी गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवत सिरीन (इंजेक्शन) बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देण्यात आला.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे ,महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे,माजी शहराध्यक्ष रमण भंडारी, कांतीलाल शर्मा,शाम पवार,सचिन पाथरक आदी उपस्थित होते . सिरिन चा बॉक्स हा शिरूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला .
या बाबत मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांनी सांगितले कि
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रावरही तसेच ग्रामपंचायत नगरपालिका अनेक विविध महत्वाच्या माध्यमांतून मोफत लसीकरण होत आहे परंतु शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये चालू असलेल्या लसीकरण यासाठी लागणारे सिरीन मात्र नागरिकांकडून बाहेरून ( मेडिकलमधून ) बेकायदेशीर पैसे देऊन आणावी लागत आहे, मगच लस देण्यात येत आहे. हा प्रकार नागरिकांची आर्थिक व मानसिक लुट करणार आहे,अशा प्रकारे चालू असलेल्या नियमबाह्य गलथान कारभाराला आळा बसावा,नागरिकांची आर्थिक-मानसिक लूट थांबावी, व सिरीन (इंजेक्शन) हे रुग्णालयामध्ये मोफतच मिळावे, यासाठी गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवत सिरीन (इंजेक्शन) बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देण्यात आला..!
गेल्या 2 महिन्यांपासून नागरिक बाहेरून सिरीन घेऊन यावी लागत आहे यात मेडिकल व ग्रामीणचे अधिकारी-कर्मचारी यांचा काही आर्थिक व्यवहार चालू आहे का..? याची चौकशी व्हावी, आज पर्यंत देण्यात आलेले लसीकरण यांचे ऑडिट व्हावे, तसेच लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या गोळ्या कुठे गेल्या याचा शोध घेण्यात यावा, व सदर कार्यालयाची दप्तरी चौकशी व्हावी..! तसेच होणारे लसीकरण नागरिकांची अडवणूक न करता, मोफतच देण्यात यावे अशा नागरिकांशी निगडित असणाऱ्या सर्व प्रश्नावर व पुढील लसीकरण काळात जर नागरिकांना सिरीन आणण्यास सांगितल्यास मनसे स्टाईलने निषेध नोंदवू असा इशारा माळवे यांनी यावेळी दिला
या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि या बाबत मला आत्ताच कळले असुन ताबडतोब मि हे सिरिन बाहेरून आणण्यास बंद केले असुन शासकीय पातळीवर ग्रामपंचायत ,नगरपालिका या शासकीय यंत्रणेकडुन ते नियोजित करणे आवश्यक आहे . काही वेळेस लसीकरणाचे येणारे डोस व सिरिन हे समसमान नसल्यामुळे काही वेळेस अडचण होत असली तरी कर्डे येथील लसीकरण केंद्रावरुन सिरीन मागवण्यास सांगितले असल्याचे मोरे यांनी सांगितले .
फोटो ओळी सिरीन (इंजेक्शन) बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देताना मनसे पदाधिकारी



