KOREGAON BHIMA
फुलगाव येथील ज्योती गवारे यांची फुलगाव ग्रामपंचायत च्या सदस्यपदी बिनविरोध निवड
कोरेगाव भीमा ama9 प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या फुलगाव, ता. हवेली ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्योती सोमनाथ गवारे यांची ग्रामपंचायतच्या सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सदस्या सुशीला नारायण वागस्कर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पोट निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. घोगरे यांनी काम पाहिले.
मागील काही वर्षांपासून गावाचा विकास हाच एकमेव उद्देश ठेवत फुलगाव ग्रामविकास पँनेल व सर्व ग्रामस्थ प्रयत्न करत असतात. ग्रामपंचायत, विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या फुलगाव मध्ये आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्योती गवारे यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भंडाऱ्याची उधळण करत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ज्योती गवारे यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने जाहिर होणारे विविध उपक्रम गावात राबविण्यात येणार असुन भविष्यात महिला बचत गटांना रोजगार, सुशिक्षित स्थानिक भूमी पुत्रांना रोजगार तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेणार असल्याचे यावेळी ज्योती गवारे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
यावेळी नामदेव वागस्कर, भानुदास साकोरे, जयवंत खुळे, कांताराम वागस्कर, नारायण खुळे, अशोक वागस्कर, वामन खुळे, राजेंद्र खुळे, सोमनाथ खुळे, राजाराम साकोरे, आप्पा साकोरे, सुदाम वागस्कर, सरपंच मंदा साकोरे, पोलीस पाटील योगिता साकोरे, योगेश कोळपकर, राहुल वागस्कर, संध्या शिनगारे, सुशीला वागस्कर, निर्मला वागस्कर, उज्वला खुळे, नयना खुळे, विशाल वंजारे, विलास खुळे, मारुती खुळे, सागर गवारे, संतोष साकोरे, किरण खुळे, सागर खुळे, कपिल वागस्कर, संभाजी वागस्कर, नवनाथ वागस्कर, प्रवीण चावट, प्रवीण शिनगारे, भानुदास वागस्कर, प्रेमशेठ मुथा, अभयशेठ नहार, किरण साकोरे, दादाभाऊ खुळे, आण्णा वागस्कर, आदिनाथ साकोरे, भिमाजी खुळे, लक्ष्मण शिंदे, सोपान गवारे, पंडित गवारे, पोपट खुळे, कांतीलाल साकोरे, दिलीप वागस्कर, नामदेव वागस्कर, संजय शिनगारे, नवनाथ गवारे, रंगनाथ गवारे, नामदेव खुळे, परशुराम जाधव, शारदा वागस्कर, मारुती वागस्कर, अर्जुन गवारे, प्रेमनाथ गवारे, विवेक आठवले, शंकर वागस्कर, चंद्रकांत साकोरे, पांडू वागस्कर, दीपक वागस्कर, रुपेश वागस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
