शिरूर तालुका
बैलगाडा शर्यतीवरील सर्वोच्य न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर शिरूर शहरात नागरिकांनी भंडारा उधळून ,पेढे वाटुन निर्णयाचे स्वागत
शिरुर ama9 वृत्तसेवा भिर्र भिर्र …. झाली झाली असा आवाज आत्ता अनेक वर्षानंतर पुन्हा घुमणार आहे . अनेक वर्ष बंद असणा- या बैलगाडा शर्यतीच्या धुरळा पुन्हा एकदा उडणार असून सर्वोच्य न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून हे वृत्त समजताच या निर्णयाचे स्वागत शिरुर शहरामध्ये शिरूर पंचक्रोशीतील नागरिकांनी भंडारा उधळून व पेढे वाटून बैलगाड्या मालक व शौकिनानी केले .
बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला असून बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे आनंदीत झालेल्या बैलगाड्या शौकिनानी शहरातील पुणे नगर रस्त्यावर जुन्या नगरपरिषद कार्यालया जवळ भंडारा उधळून व पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , युवकचे अध्यक्ष रंजन झांबरे , लिगल सेलचे शहरअध्यक्ष ॲड .रवींद्र खांडरे, तालुका उपाध्यक्ष अमोल वर्पे ,रमेश दसगुडे , रविंद्र कर्डिले ,सर्जेराव दसगुडे,पांडुरंग पाचर्णे , ज्ञानेश्वर रेपाळे ,बाबासाहेब नवले, संतोष ढेरंगे , अरुण दौंडकर आदी सह नागरिक उपस्थित होते .
फोटो ओळी बैलगाडा शर्यत बंदी उठवल्यानंतर शिरुर येथे पेढे वाटुन आनदौत्स्व साजरा करताना पंचक्रोशीतील नागरीक



