शिरूर तालुका
शेतकरी व नागरीकांकडुन वीजबीलासाठी केलेली सक्ती ही एक प्रकारची सावकारकी असल्याचा आरोप करत शिरुर -हवेली मनसेने आज निषेधार्थ महावितरण कंपनीस कंदील भेंट देऊन निषेध व्यक्त केला.
शिरूर amag वृत्तसेवा महावितरणने शेतकरी व नागरीकांकडुन वीजबीलासाठी केलेली सक्ती ही एक प्रकारची सावकारकी असल्याचा आरोप करत शिरुर -हवेली मनसेने आज निषेधार्थ महावितरणच्या उपकार्यकारी अभियंते सोमनाथ माने यांना कंदील भेंट देऊन निषेध व्यक्त केला.
महावितरणाने शेतकऱ्यांवरील व सर्वसामान्य ग्राहकांवरील जुलमी महावसुली सावकारकी बंद करावी अन्यथा याचा निषेध म्हणून महावितरणास कंदील भेट देण्यात येईल असा इशारा शिरूर हवेलीचे मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव यांनी निवेदनाद्वारे दिनांक ६ डिसेंबर रोजी दिला होता . या निवेदनात सहा दिवसाची मुदत महावितरण कंपनीस देण्यात आली होती .
या वेळी मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव,जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे , शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे , रयत शेतकरी संघटनेचे भरत काळे , महिला आघाडीच्या डॉ वैशाली साखरे , शारदा भुजबळ,उपतालुकाअध्यक्ष रविंद्र गुळादे , माजी शहरअध्यक्ष संदीप कडेकर , रमण भंडारी ,हुडको कृती समितीचे शैलेश जाधव, मनसे शहर सचिव विकास साबळे,शाखा प्रमुख शिक्रापुर प्रेम नायकोडी , नितीन वायकर आदी उपस्थित होते .
या वेळी तालुकाअध्यक्ष तेजस यादव यांनी सांगितले कि
कोरोना महामारीत संपूर्ण देश लॉकडाऊन होता त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे हेळसांड झाली असताना अतोनात नुकसान झाले असून आपल्या महावितरणाकडून जो जुलूम, महावसुली सावकारकी केली जाते ती थांबवावी तसेच महावितरण शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांची लूट व जुलूम महावसुली व सावकारकी कशी केली जाते ते खालीलप्रमाणे
शेतकऱ्यांचे कोटेशन ३ एच.पी असताना अचानक ५ एच.पी. बिलावर देऊन वाढीव बिल
देण्यात येते ही महावसुली सावकारकी नाही का? , परंतु पुढच्या वेळी ग्राहकाच्या त्या मीटरचे रिडींग घेतले असता युनिटमध्ये १०० युनिटपेक्षा जास्त हु असल्याने दुप्पट दराने वीज बिल आकारुन त्याला व्याज लावून आकारले जाते, ही, सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट घेऊन कनेक्शनसाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष ग्राहकालाच आणावे लागते आणि सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट आकारुन ग्राहकाच्या बिलावर नोंद नाही हा सरळसरळ घोटाळा असून ही महावसुली सावकारकी नाही का?सर्वात महत्त्वाचा मुद्दा वीज कनेक्शन तोडण्यासाठी १५ दिवसाआधी नोटीस देणे गरजेचे असताना अचानक गावच्या गावे व त्या गावांमधील रोहित्रे पुर्णपणे बंद करून वीज खंडीत केली जाते हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य जय जवान…. जय किसान… या वाक्याला छेद देण्याचे काम करुन महावितरण महावसुली सावकार आहेत, हे स्पष्ट होत आहे. यापुढे अशाप्रकारचे वीज खंडीत करु नये व गावच्या गावे अंधारात ठेवू नये असे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ दिवसानंतर आपणास कंदीलाची प्रतिकृती भेट देण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर दिनांक १७ रोजी विज वितरण कंपनीस कंदिल भेट दिला असल्याचे यादव यांनी सांगितले .
फोटो ओळी महावितरण कंपनीच्या अधिकारी यांना कंदील भेट देताना मनसेचे तालुकाअध्यक्ष तेजस यादव व पदाधिकारी



