शिरूर तालुका

कान्हुर मेसाई येथील विद्याधाम प्रशालेत मुक्या’ झालेल्या क्रीडांगणाने टाळ्या,शिट्ट्या आणि थरार.. दोन वर्षानी अनुभवला .

शिरूर ama9  वृत्तसेवा 
कबड्डी .. कबड्डी… कबड्डी हे शब्द दोन वर्षानी पुन्हा एकदा जोरात मैदानावर घुमले . 
मुक्या’ झालेल्या क्रीडांगणाने  टाळ्या,शिट्ट्या आणि थरार.. दोन वर्षानी अनुभवला . 
कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षांपासून मुकी असणारी शाळांची क्रीडांगणे दयनीय अवस्थेत आहेत.मात्र,कान्हूर मेसाईच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अत्यंत शिस्तबद्ध व नियमांचे पालन करीत,शालास्तरावर प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत मुलांमधील क्रीडानैपुण्याला वाव दिला.ह्यानिमिताने मुक्या झालेल्या क्रीडांगणाने शिट्ट्या,टाळ्या आणि खेळातील थरार अनुभवला.दोन वर्षानंतर होत असलेल्या ह्या प्रो कबड्डी स्पर्धेने खेळाडूंमध्ये एक चैतन्य व आनंद दिसून आला.स्पर्धेचे उदघाटन राज्य युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे व राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार व विद्यालयाचे माजी विद्यार्थी संतोष घोलप यांच्या हस्ते झाले.ह्यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव सुदाम तळोले,संचालक शहाजी दळवी,सोपान पुंडे, विठ्ठल खर्डे,विजय घोलप,सिद्देश धुमाळ,प्रयाग नरवडे,हर्षवर्धन पाटील,सौरभ खाडे, अशोक मिडगूले, महेश नाणेकर,आविष्कार ननवरे, निखिल नाणेकर आदी उपस्थित होते.
            विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करताना इतरांचे अनुकरण करू नये.अनेक क्षेत्रात क्रीडापटूसाठी जागा राखीव असतात.ग्रामीण भागातील मुलांनी विविध खेळांमध्ये नैपुण्य मिळवावे असे आवाहन संग्राम शेवाळे यांनी केले.विद्यालयाचे क्रीडांगण अद्ययावत व सुसज्ज करण्यासाठी संतोष घोलप यांनी यावेळी मदत केली.प्रास्ताविक करताना प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले की,कोरोनाच्या काळात शहरी भागामध्ये मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे.ग्रामीण भागामध्ये पण ही समस्या जाणवत आहे.मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविली पाहिजे,त्यासाठी त्यांनी मैदानी खेळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ह्या निमित्ताने मुलांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे.स्पर्धेचे पंच म्हणून संतोष साळुंखे व  गुरुदत्त विद्यालय सविंदणेचे क्रीडाशिक्षक नामदेव कंठाले सर यांनी काम पाहिले.स्पर्धेचे समालोचन प्रा.मच्छीन्द्र राऊत यांनी केले.विद्यालयातील क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर पुंडे व प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
फोटो ओळी दोन वर्षानंतर कबड्डी खेळताना शाळेतील विद्यार्थी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button